देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
रोजगाराची सद्यस्थिती पाहता आज एका निर्णायक वेळेवर आपण उभे आहोत. योग्य बाजूला सत्तेचे पारडे झुकविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे उठा, जागृत व्हा आणि भविष्यातील कोल्हापूरची नवनिर्मिती करण्यासाठी विकासाची दृष्टि आणि क्षमता असणाऱ्या ऋतुराज पाटील य ...
मोदींचा जप करीत युवक आयुष्य बरबाद करीत आहेत. भाजप सत्तेवर आल्यापासून देशात बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी येथे केली. ...
मी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. तसेच काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबतची बोलणीही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तसेच इतर कुठलेही पद माझ्याकडे असण्याचा प्रश्नच येत नाही असा खुलासा ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आज येथे केला. ...
येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभेचे मतदान असून सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. परंतु, एमआयएमच्या उमेदवाराने काँग्रेसला पाठिंबा देऊन शस्त्र खाली ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मदत आणि सल्ला घेतलेला आहे. मात्र ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे निवडणूक येताच त्यांच्यामागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावले. ...
काँग्रेसच्या राष्ट्रभक्तीला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे फटकारत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेस सावरकरविरोधी नसल्याचे स्पष्टीकरण गुरुवारी दिले. ...