देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Election 2024: महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होत असलेल्या या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडीतील मुकाबल्यात या भागातील काही मतदारसंघांचे गणित बदलू शकते. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नागपूर येथे ‘संविधान सन्मान संमेलन’ आणि मुंबईत ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ घेऊन विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहे. ...
Shahu Maharaj On Satej Patil: माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 : नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तर ६ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी आरएसएसचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. ...