देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Delhi Assembly Elections : काँग्रेसने 'आप' संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्लीतून ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. तर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांना बादलीमधून तिकीट देण्यात आले आहे. ...
Congress Vijay Wadettiwar News: परभणीतील प्रकाराकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यामुळे परभणीत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याला सरकार जबाबदार आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Congress Nana Patole Reaction On Parbhani Agitation: संविधान न मानणाऱ्या विचाराचे लोक सत्तेत आहेत त्यामुळे असे प्रकार होत आहेत. परभणीतील घटनेचा नागपूरच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...