देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Caste Census: राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरल्याने मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. जातनिहाय जनगणना झाली तर मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation) प्रश्न मार्गी लागेल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ...
Pahalgam Terror Attack: नरेंद्र मोदींविरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे काँग्रेसचे नेते आणि उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनीही नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच भारतीय हवाई दलाकडे असलेल्या राफेल विमानांना खेळण्याची उप ...
Harshvardhan Sapkal News: भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त ...
Congress Harshwardhan Sapkal News: भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले. लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले नाहीत. निवडणुकीतील शब्द पाळला नाही, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...