देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी निळ्या रंगाचा कोट आणि काळी पँट परिधान केलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात एक किटली आणि चहाचा ग्लास आहे. मागे आंतरराष्ट्रीय ध्वज आणि भारतीय ध्वज दिसत आहे. ...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहे यांनी आज काँग्रेसवर टीका केली. नेहरु यांना सरकारी पैशांनी बाबरी मशीद बांधायची होती असे त्यांनी विधान केले. दरम्यान, आता या विधानावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले. ...