राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८, मराठी बातम्याFOLLOW
Commonwealth games 2018, Latest Marathi News
क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... Read More
भारत २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या अभियानाला गुरुवारी सुरूवात करणार आहे. यात सर्व खेळाडूंचे लक्ष्य विश्व विजेती भारोत्तोलक मीराबाई चानु हिच्यावर असेल. ती पदकाची प्रबळ दावेदार आहे. त्यासोबतच बॅडमिंटनपटू आणि बॉक्सर्सवरही भारतीय संघाचे लक्ष असेल. ...
गेल्या काही महिन्यांपासून फॉर्ममध्ये असलेला भारतीय महिला हॉकी संघ २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेल्सविरोधात आपल्या अभियानाला सुरूवात करणार आहे. २००६ नंतर पहिल्यांदा पदक पटकावण्याच्या उद्देशाने भारतीय संघ खेळणार आहे. ...
भारतीय बॅडमिंटन संघ अंतिम लढतीत पोहचेल, असा विश्वास भारताचे मलेशियन प्रशिक्षक टॅन किम हर यांनी व्यक्त केला. भारताची अंतिम लढत मलेशियाशी होईल असेही त्यांना वाटते. ...
सिरिंज वादानंतरही उंचावलेल्या मनोधैर्यासह भारतीय पथक बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. दरम्यान, स्पर्धेला प्रारंभ होण्यास केवळ एक दिवसाचा वेळ शिल्लक आहे, पण गोल्ड कोस्ट शहरात मात ...
आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील खेळाडू किदांबी श्रीकांत यांना बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष विभागात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. महिला एकेरीमध्ये ६४ खेळाडूंच्या ड्रॉमध्ये सिंधू आपल्या मोहिमे ...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोध्यांना मंगळवारी खूप चांगला ड्रॉ मिळाला असून, त्यात दिग्गज एम. सी. मेरी कोम हिला पदक जिंकण्यासाठी फक्त एक लढत जिंकण्याची गरज आहे, तर विकास कृष्णनला पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाला आहे. ...
सायनाला कोणतीही दुखापत वगैरे नक्कीच झालेली नाही, तिचा सरावही चांगला सुरु आहे. पण तरीदेखील स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सायना हताश झालेली पाहायला मिळाली. ...