‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने या चित्रपटातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्या असून आओ राजा आणि काफिराना यांसारख्या काही तुफान गीतांवरही ती थिरकली आहे. Read More