चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
चंद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर, अनेक देशांनी अंतराळ क्षेत्रात भागिदारीसाठी भारतासोबत संपर्क साधला आहे. यात सौदी अरेबिया, सिंगापूर आणि साऊथ कोरियाचा समावेश आहे. ...