क्रिटिकल थिंकिंग म्हणजे सुयोग्य नेमके निर्णय घेणं! करू की नको, कसं करू, मला जमेल का, परिस्थितीच हातात नाही, असं न म्हणता नेमका निर्णय घेऊन जो कामाला लागेल, तोच गो गेटर सिकंदर ठरेल! ...
पीपल मॅनेजमेंट म्हणजे लोकांचं व्यवस्थापन. माणसांना आवरणं नव्हे सावरणं. आपल्या बॉसने आपल्याशी जसं वागावं असं वाटतं, तसं हाताखालच्या माणसांशी वागणं. सोपी नसेल; पण अवघडही नाही ही गोष्ट. ...
सर्व्हिस ओरिएन्टेशन म्हणजे ग्राहक सेवा. ग्राहक म्हणजे देव हे नुस्तं म्हणण्याचा काळ गेला. जमाना आहे, उत्तम कस्टमर केअरचा; ते जमलं तर बिझनेस, नाही तर ठप्प! ...
इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. डोक्यानं कमी असला तरी चालेल माणूस मनानं बरा हवा, असा भावनिक मामला थेट भावनिक बुद्धिमत्तेवर येऊन पोहोचलाय! ...
जजमेंट अॅण्ड डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णयक्षमता. काही प्रश्न निर्णय न घेतल्यानेच सुटतात असं म्हणायचे दिवस गेले. धडाडीनं निर्णय घेणं, वेळेत घेणं आणि ते राबवणं हेच मोठं स्किल आहे. ...