Emotional Intelligence - भावनांना आवरत-सावरत डोकं वापरण्याची खास बुद्धिमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 07:25 AM2020-01-16T07:25:00+5:302020-01-16T07:25:02+5:30

इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. डोक्यानं कमी असला तरी चालेल माणूस मनानं बरा हवा, असा भावनिक मामला थेट भावनिक बुद्धिमत्तेवर येऊन पोहोचलाय!

Emotional Intelligence - The special intelligence of using emotions -a Must skill | Emotional Intelligence - भावनांना आवरत-सावरत डोकं वापरण्याची खास बुद्धिमत्ता

Emotional Intelligence - भावनांना आवरत-सावरत डोकं वापरण्याची खास बुद्धिमत्ता

googlenewsNext
ठळक मुद्देजॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

अतुल कहाते,  डॉ. यश वेलणकर

तत्नज्ञानाची किंवा इतर कौशल्यांची उत्कृष्ट जाण असलेले अनेक लोक व्यवस्थापक म्हणून पार अपयशी ठरत असल्याची असंख्य उदाहरणं सापडतात. अलीकडच्या काळात परंपरेनं ज्याला आपण ‘मेंदूची’ बुद्धिमत्ता म्हणतो; तिच्या जोडीलाच भाविनक बुद्धिमत्ता खूप महत्त्वाची मानली जाते. काहीवेळा तर ‘आम्हाला फार हुशार नसलेले लोक चालतात; पण ते वागायला चांगले हवेत’ असं अनेक कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात. याचं कारण म्हणजे एका माणसाच्या जिवावर कंपनी चालत नसते. अनेक लोक एकत्न येऊन तिचं दैनंदिन काम बघत असतात. अशावेळी फटकळ, उर्मट, प्रचंड ईगो असलेला माणूस कंपनीच्या यशाला आणि वाढीला मारक ठरू शकतो. कित्येकदा तर या लोकांना आपण असं वागत आहोत याची जाणीवसुद्धा होत नाही; इतके ते कोरडे असतात!
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनांमध्ये वाहून जाणं असं अजिबातच नाही. आपल्या भावनांची इतरांनी कदर करावी असं प्रत्येक माणसाला वाटत असतं; याची जाणीव ठेवणं आणि त्यानुसार वागणं म्हणजे भाविनक बुद्धिमत्ता विकसित करणं. याचाच सोपा अर्थ म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांशी नीट वागणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, कुणाला विनाकारण अपमानास्पद न बोलणं, वेळप्रसंगी त्यांना धीर देणं आणि हे सगळं करत असताना त्यात कृत्रिमपणाचा लवलेश नसणं. माणसाला संवादाची गरज असते. त्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांशी गप्पा मारायच्या असतात, काहीतरी शेअर करायचं असतं. हे सगळं ओळखून या गरजा पूर्ण करणं भावनिक बुद्धिमत्तेमध्ये बसतं. अर्थातच याचा अर्थ आपलं काम सोडून कुणाला काय वाटतं आहे, कुणी दुखावलं आहे का, कुणाला आपल्याशी काही बोलायचं आहे का, याचाच विचार करत बसणं असा होत नाही. गरज पडेल तेव्हा आपण आपल्या सहकार्‍यांचा आनंद, त्यांची दुर्‍ख यांच्यात एका मर्यादेर्पयत सहभागी होऊ असा विश्वास त्यांच्या मनात असणं म्हणजे आपली भावनिक बुद्धिमत्ता विकसित होणं. 
कठीण प्रसंगांमध्ये विचलित न होता योग्य निर्णय घेणं, आपलं मानसिक संतुलन सहजासहजी ढळू न देणं, आपला मेंदू आणि आपलं मन यांच्याकडून सतत येत असलेल्या इशार्‍यांची सांगड घालून पुढे जात राहाणं ही भावनिकदृष्टय़ा बुद्धिमान असलेल्या माणसाची लक्षणं आहेत.


त्यासाठीची मानसिक कौशल्यं  कशी कमवायची?


1. आपल्या बर्‍याच भावना भावनिक मेंदूची प्रतिक्रि या म्हणून निर्माण होत असतात. हा भावनिक मेंदू वैचारिक मेंदूपेक्षा खूप अधिक वेगानं काम करतो. त्याचमुळे बुद्धीला पटत असलं तरी त्नासदायक भावनांची प्रतिक्रि या थांबवता येत नाही. कळतं; पण वळत नाही अशी स्थिती होते.
2. हे बदलण्यासाठी सजगतेचा सराव उपयुक्त ठरतो. हा सराव म्हणजे भाविनक मेंदूला दिलेलं प्रशिक्षण असतं.
3. मेंदू पाच ज्ञानेंद्रियं वापरून परिसराची माहिती आणि तीन पद्धतीनं शरीराची माहिती घेत असतो. त्याचा अर्थ लावत असतो. भूतकाळातील स्मृती आणि भविष्यातील शक्यता याचाही तेव्हाच विचार करतो. या सर्व फाइल्स एकाच वेळी सक्रि य असल्या तरी त्या सार्‍या आपल्या जागृत मनाला जाणवत नाहीत. त्यावेळी जी डोक्यातली फाइल प्रबळ होते तोच विचार फक्त आपल्याला जाणवतो. 4. एका खोलीत दहा माणसे बसून आपापलं काम करीत असावेत तसे मेंदूत अनेक भाग आपले काम करत असतात. त्यामधूनच विचार जन्माला येतात. पण एखादाच मोठय़ानं ओरडला की, सगळे त्याकडे पाहतात. तसंच मेंदूतदेखील विचारांचं घडतं. एक विचार प्रबळ झाला की तोच डोक्यात फिरू लागतो. त्यालाच आपण भावना म्हणतो.
5. म्हणूनच भीती वाटते, किंवा राग येतो त्यावेळी त्याच घटनेचे विचार खूप मोठय़ा संख्येनं आणि वेगाने निर्माण होतात, अन्य गोष्टींचं भान राहत नाही. राग, उदासी, वासना अशा भावना खूप तीव्र असतील तर सैराट कृती घडून जाते. ते होता कामा नये.
6. माइण्डफूलनेसच्या सरावानं ही तत्काळ अंध प्रतिक्रि या करण्याची भावनिक मेंदूची सवय बदलते. हा मेंदू शरीरात काय घडते आहे ते जाणून त्यालाही सतत प्रतिक्रि या करीत असतो. माइण्डफूल राहायचे म्हणजे स्वतर्‍च्या शरीरावर लक्ष नेऊन जे काही जाणवते आहे त्याला प्रतिक्रि या न करता त्याचा स्वीकार करायचा.
7. भावनिक मेंदूची सक्रियता कमी करून भावनिक बुद्धी वाढवता येते.

Web Title: Emotional Intelligence - The special intelligence of using emotions -a Must skill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.