श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
IIT-BHU News : गेल्यावर्षी वाराणसीतील IIT-BHU मध्ये बी टेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या आरोपींना जामीन मिळाला आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींसोबत भाजप आमदाराचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ...
Mahayuti Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीच्या राज्य पातळीवरील नेत्यांकडून तिन्ही पक्षात समन्वय असल्याचे दावे केले जात आहेत. पण, वेगवेगळ्या मतदारसंघात स्थानिक पातळीवर सुप्त संघर्ष होताना दिसत आहे. ...
यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधत बोचरे प्रश्न केले आहेत... ...
KC Tyagi News : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल संयुक्त पक्षाचे एक प्रमुख नेते असलेल्या के.सी. त्यागी यांनी अचानक राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाने राजीव रंजन यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. ...
Caste Wise Census: जातनिहाय जनगणनेसाठी 'इंडिया' आघाडी तसेच मित्र पक्षांकडून वाढत चाललेला दबाव पाहता केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकार ही मागणी मान्य करण्याच्या दृष्टीने विविध दृष्टिकोनांतून चाचपणी करत आहे. ...