एकेकाळच्या निसर्गरम्य व राष्टय पक्षी मोरांचे थवे जागोजागी दिसणाऱ्या देवपूर गावात मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने निसर्ग-प्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे. ...
वाढत्या उन्हामुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांचे हाल होत आहे. तीव्र उन्हात पक्ष्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दाणा-पाणी उपक्रमांतर्गत झाडांवर ठिकठिकाणी प्लास्टिक टोपल्यांमध्ये पाण्याची सुविधा केली ...
पक्ष्यांबद्दल माणसांना कायमच कुतूहल राहिले आहे. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच पक्ष्यांची किलबिल आवडत असते. परंतु हेच पक्षी रखरखत्या उन्हात जेव्हा दाणे-पाण्यावाचून तडफडत मरतात तेव्हा मात्र खूप वेदना होतात. हे चित्र बदलण्यासाठी महात्मा बह ...
प्राण्यांची होणारी कत्तल व अत्याचार थांबविण्यात यावेत, तसेच प्राणी रक्षण कायद्यात आवश्यक सुधारणा करावी या मागणीसाठी पशुप्रेमींच्या वतीने शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना २ एप्रिल रोजी देण्यात आले. ...
युरोप, आफ्रिका, आशिया खंडात आढळणारा ‘चिलडोनिअस ल्युकोपटेरेस’ हा देखणा पक्षी रविवारी यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा धरणावर प्रथमच आढळला. त्यामुळे जिल्ह्याच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद झाल्याचा आनंद पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केला. ...
पक्षीनिरीक्षण आणि त्यांच्या अभ्यासाचा छंद जोपासणाऱ्या विश्वजित यांनी आपल्या घरी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम घरटी तयार केली आहेत. सध्या त्यांच्या या घरट्यात पोपट, कोकीळ, बुलबुल, सातभाई, शिंपी, साळुंखी, शिपाई, बुलबुल, लालबुड्या ब ...
सजीव सृष्टीतील प्राणीमात्रांचे काय, मानवाचे वाढते अतिक्रमण निसर्गासाठी मारक ठरत आहेत. वाढत्या सिमेंटीकरणाने पक्षी अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे. परिणामी नागरी वसाहतीत राहणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. ...
‘एक होती चिऊ अन् एक होता काऊ. चिमणीचं घर मेणाचं, काऊचं घर शेणाचं.’ ही गोष्ट ऐकत आपण मोठे झालो; पण शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षांत चिऊताई शहरांमध्ये दिसेनाशी झाली आहे. लहानग्या बाळाला घास भरवताना ‘एक घास चिऊचा’ असे दाखवलायही चिमणी शिल्लक राहिलेली नाह ...