वाढीव वीज बिलाविरुद्धचा असंतोष वाढत आहे. सोमवारी वीज बिलाविरुद्ध विदर्भवाद्यांनी मंत्र्यांचे पुतळे जाळले तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून ऊर्जामंत्र्यांना निवेदन सादर केले. ...
राज्यभरातील असंख्य नागरिकांना चुकीची वीज बिले पाठविण्यात आल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्याचे वीज बिल एकाच वेळी पाठवण्याच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे बिल रद्द करावे, या मागणीसाठी शनिवारी पक्षातर्फे नगारा आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरात विविध चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी नगारे वाजवून निषेध केला. ...
कोरोनाच्या संकटादरम्यान वाढीव वीज बिलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीने याविरुद्ध आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत शुक्रवारी ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ‘वीज बिल वापसी’ आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते ऊर्जाम ...
शहर भाजपने वीज बिल दरवाढीविरोधात शनिवारी बूथनिहाय आंदोलन केले. आंदोलनातून वीज बिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून चार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. ...
मार्च महिन्यानंतर जूृन महिन्यामध्ये आलेल्या वीज बिलांसंदर्भात तक्रारींमध्ये बरीच वाढ झाली आहे. मंगळवारी महावितरणच्या ‘वेबिनार’मध्ये अगदी काही तासातच ५१५ ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या. तर कंपनीच्या कार्यालयामध्ये असलेल्या तक्रार निवारण केंद्रामध्येही ...
कोरोनामुळे ३ महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने ३ महिन्याचे वीज बिल पाठवून झटकाच दिला आहे. महावितरणने ५० टक्के वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्य अभियंता दिलीप दोडके ...
नागरिकांना येत असलेल्या वाढीव वीज बिलाविरुद्ध भाजप रस्त्यावर उतरली आहे. पक्षाने सोमवारी शहरातील सहा मंडळांमध्ये निदर्शने करीत नागरिकांना वीज बिलात दिलासा देण्याची मागणी केली. यादरम्यान राज्य सरकार व राज्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी करण् ...