जागोजागी आंदोलन : वीज बिलाच्या विरोधात भाजपने मागितली भीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 09:03 PM2020-08-14T21:03:24+5:302020-08-14T21:08:18+5:30

महावितरणद्वारे नागरिकांना पाठविण्यात आलेले तीन-चार महिन्याच्या वीज बिलाच्या विरोधात भाजपने शुक्रवारी जागोजागी आंदोलन केले. दरम्यान, पार्टीने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल रद्द करून ३०० युनिटपर्यंत बिल माफ करण्याची मागणी केली.

Place to place agitation: BJP begs against electricity bill | जागोजागी आंदोलन : वीज बिलाच्या विरोधात भाजपने मागितली भीक

जागोजागी आंदोलन : वीज बिलाच्या विरोधात भाजपने मागितली भीक

Next
ठळक मुद्देवीज बिल रद्द करून ३०० युनिट वीज माफ करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणद्वारे नागरिकांना पाठविण्यात आलेले तीन-चार महिन्याच्या वीजबिलाच्या विरोधात भाजपने शुक्रवारी जागोजागी आंदोलन केले. दरम्यान, पार्टीने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिल रद्द करून ३०० युनिटपर्यंत बिल माफ करण्याची मागणी केली.
इतवारी शहीद चौकात शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आ. गिरीश व्यास यांनी नागरिकांकडून भीक मागितली. दटके म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने बिल पाठवून नागरिकांवर अन्याय केला आहे. ४० हजार रुपयांचे बिल आल्यावर एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. याची तक्रार यशोधरानगर पोलीस ठाण्यात केल्यावर, ठाणेदाराची बदली करण्यात आली. राज्य सरकारचा अहंकार दूर करण्यासाठी पक्षाने केलेले हे आठवे आंदोलन आहे. नागरिकांकडून मिळालेली भीक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. आ. अनिल सोले यांच्या उपस्थितीत खामला वीज वितरण कार्यालय तसेच शंकरनगर येथे आंदोलन झाले. आ. कृष्णा खोपडे यांनी सतरंजीपुरा ते चिंतेश्वर सब स्टेशन दरम्यान भीक मागितली. नरेंद्रनगर, शंकरनगर, सतरंजीपुरा, तुकडोजी पुतळा, गांधीबाग, गणेशपेठ, तुुलसीबाग, चिंतेश्वर,ऑटोमोटिव्ह चौक, राणी दुर्गावतीनगर, कमाल चौक, खामला, लक्ष्मीनगर, जयताळा, त्रिमूर्तीनगर, प्रतापनगर, काँग्रेसनगर, तुकडोजी पुतळा चौक, अजनी, भोला गणेश चौक व सक्करदरा मिरची बाजार चौकात आंदोलन करण्यात आले.
महापौर संदीप जोशी, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार मोहन मते, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, मंडळ अध्यक्ष संजय चौधरी, देवेंद्र दस्तुरे, संजय अवचट, विनोद कन्हेरे, किशोर पलांदुरकर, किशोर वानखेडे, संघटन मंत्री भोजराज डुंबे, माजी महापौर अर्चना डेहनकर, धर्मपाल मेश्राम, दयाशंकर तिवारी, संजय बंगाले, संजय ठाकरे, सुनील मित्रा, महिला आघाडी अध्यक्ष कीर्तिदा अजमेरा यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

Web Title: Place to place agitation: BJP begs against electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.