बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ३६ नवीन कोरोनाचे रुग्ण वाढल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याने दिली आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अडीचशे पार झाला आहे. ...
मुसळधार पावसामुळे शहरातील बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील तात्पुरत्या भाजी मार्केटची पार दुर्दशा होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे शुक्रवार दि. ५ जून पासून सदर मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्याप ...
स्वॅब तपासणीचे अहवाल हाती येण्याआधीच इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन रुग्णांना घरी जाण्यास मोकळीक देण्याचा प्रकार उघडकीस आला असून यापैकी कांही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुतगा (ता. बेळगाव) येथे भितीचे वातावरण पसरले आहे. ...
अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला. कर्नाटक सरकारच्या कार्यदर्शीनी आज हा आदेश काढला. अथणीचे आमदार महेश कुमटहळी हे यापूर्वी निगम महामंडळाचे अध्यक्ष होते. ...
रस्त्यावरून जाणाऱ्या एका कार गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलनजीक गणेशपुरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. ...
बेळगाव येथील एका ३0 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे बेळगावची कोरानाबाधितांची संख्या १४७ झाली असून कर्नाटकात एकुण १९२२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले आहे. ...
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित प्रवासी कर्नाटकात येत आहेत. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ई -पास असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांना कांही दिवस कोगनोळी टोल नाक्यावरून कर्नाटकात प्रवेश दिला जाऊ नये, असा सक्त आदेश शनिवारी कर्नाटकचे गृहमंत्री ब ...