CoronaVirus: Hirebagewadi, the first sick village in Belgaum district, became corona free | CoronaVirus : बेळगाव जिल्ह्यातील पहिला रुग्ण आलेले हिरेबागेवाडी कोरोनामुक्त

CoronaVirus : बेळगाव जिल्ह्यातील पहिला रुग्ण आलेले हिरेबागेवाडी कोरोनामुक्त

ठळक मुद्देबेळगाव जिल्ह्यातील पहिला रुग्ण आलेले गाव कोरोनामुक्त हिरेबागेवाडीत होते तब्बल ४९ रुग्ण, गावातील लोकांनी घेतला मोकळा श्वास

बेळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झालेले आणि कम्युनिटी स्प्रेड झालेले हिरेबागेवाडी गाव कोरोनामुक्त झाले आहे. शुक्रवारी या गावचा शेवटचा रुग्ण निगेटिव्ह झाला, त्यानंतर गावकऱ्यानी तब्बल दोन महिन्यानी मोकळा श्वास घेतला आहे.

बेळगावात दिल्ली मर्कजहुन ३ एप्रिल रोजी आलेले पहिले तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले होते, त्यात बेळगुंदी, हिरेबागेवाडी आणि कॅम्पचा प्रत्येकी एक रुग्ण होता. त्या दिवशीपासून जवळपास दोन महिन्यांहुन अधिक काळ हिरेबागेवाडी गाव कंटेनमेंट झोन होते.

सामुदायीक संसर्ग झाल्याने या गावात तब्बल ४९ रुग्ण सापडले होते. यामध्ये अनेक पोलीस, अंगणवाडी शिक्षिका यांचा समावेश होता आणि लागण झालेल्या होती एका वृद्धेचा देखील मृत्यू झाला होता. ५ जून रोजी अर्धशतक रुग्णांच्या उंबरठ्यावर असलेले गाव निगेटिव्ह झाल्याने सर्व ४९ रुग्ण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे गावकऱ्यानी मोकळा श्वास घेतला आहे. शुक्रवारी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी या गावाला भेट देत रेशन किटचे वितरण केले होते.

Web Title: CoronaVirus: Hirebagewadi, the first sick village in Belgaum district, became corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.