हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
देशाचे उद्योगमंत्री, संरक्षणमंत्री, मुंबईचे बंद सम्राट, अशी पदे भूषविणारा जॉर्ज स्वतःच्या गरजा अत्यंत कमी ठेवून होता. साधी चप्पल त्याला पुरेशी असे. खिशात किती पैसे आहेत, याचं त्यालाही भान नसायचं. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांतून व्यंगचित्र काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'ठाकरे' सिनेमा बॉक्सऑफिसवर आज झळकला आहे. रिलीजनंतरही ठाकरे सिनेमावरुन काही-न्-काही वाद सुरूच आहेत. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यातील स्मारकासाठीची कागदपत्रे बुधवारी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आ ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर निवास येथे उभारण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे गणेशपूजन करण्यात आले आहे. ...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांना ट्विटरवरून विनम्र अभिवादन केले आहे. ...