Chandrakant Khaire Controversial statement | बाळासाहेब ठाकरेंकडे होती दैवी शक्ती ; चंद्रकात खैरेंचा अजब दावा
बाळासाहेब ठाकरेंकडे होती दैवी शक्ती ; चंद्रकात खैरेंचा अजब दावा

औरंगाबाद - शिवसनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकात खैरे हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. औरंगाबादमध्ये महानगरपालिकाच्या एका कार्यक्रमात आले असता त्यांनी, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल अजब दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचा हास्यास्पद दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

औरंगाबाद महानगरपालिकीच्या सिद्धार्थ उद्यानातील वाघांच्या चार बछड्यांचा नामकरण सोहळा शनिवारी संपन्न झाला. त्यांनतर खैरे पत्रकारांशी बोलत असताना, बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दैवी शक्ती होती असा हास्यास्पद दावा केला आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगताना ते म्हणाले की, बाळासाहेबांचे व्याघप्रेम अपार होते. मी वनमंत्री असताना बाळसाहेब यांना व्याघ्रप्रकल्प मध्ये घेऊन गेलो होतो. त्यावेळी पिंजऱ्यातील वाघांने बाळासाहेबांशी हात मिळवला होता. मी हे स्वत: पाहिले आहे. ही प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे. त्यावेळी बाळासाहेबांकडे खरी आणि किती दैवी शक्ती होती हे आम्हाला पहायला मिळाले. असे खैरे म्हणाले. 

याआधी सुद्धा , भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन अत्यवस्थ असताना आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. नाहीतर, प्रमोद महाजन यांच्या नाडीवर भस्म लावून जप करून त्यांना वाचविले असते, असा खळबळजनक आणि हास्यास्पद दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता.

 

 


Web Title: Chandrakant Khaire Controversial statement
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.