साताऱ्यातील साई संस्कृती सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर खेळताना एका अडीच वर्षीय बालकाने घराच्या दरवाजाच्या कड्या लावल्या अन् त्या उघडाव्या कशा हे त्यालाही सुचेना अन् बाथरूममध्ये अडकलेल्या आजीलाही काही कळेना. त्यामुळे दोघेही अडकून पडले. ...
शहरातील प्रत्येक वॉर्डाला समान पाणी मिळावे या हेतूने ११ मेपासून तीन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. मागील दहा दिवसांमध्ये एकाही वॉर्डाला तीन दिवसाआड पाणी मिळाले नाही. ...
मान्सून यंदा लवकर धडकणार आहे. मान्सूनपूर्वी महापालिकेला दरवर्षी नालेसफाई करावी लागते. मे महिना संपत आला तरी नालेसफाईचा नारळ प्रशासनाने फोडला नाही. प्रशासनाकडून १९ मेपासून बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यावर महापालिका नालेसफाई करणार का? ...
शहरातील जालना रोड, बीड बायपास या महत्त्वाच्या रस्ता रुंदीकरणाचा ७८९ कोटी रुपयांचा प्रकल्प गुंडाळण्याच्या वाटेवर आहे. प्रकल्पाचे ‘बजेट’कमी करून मंजुरी देण्याचा मुद्दाही नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) दिल्ली मुख्यालयाने सोडून दिला आहे. ...
महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी १५ ते २० दिवसांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्या पदावर बसण्यासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांच्या मुंबई वा-या वाढल्या असून, प्रत्येकाने नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे ...