अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला. ...
अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे एका युगाचा अंत झाला आहे. त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत भारतीय राजकारणाची गुणवत्ता वाढवली. सरकार चालविण्याची जी प्रक्रिया आहे तिला उद्देशपूर्ण केले. त्यांनी भारतीय राजकारणात काँग्रेसला पर्यायच उत्पन्न होणार ...
मेरे प्रभू मुझे इतनी उंचाई कभी मत देना, गैरोंको गले न लगा सकूँ, इतनी रूखाई कभी मत देना . शांतताप्रिय, निसर्गप्रेमी आणि संवेदनशील कविमनाच्या अटलबिहारी या आदर्श आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला एकदाच नव्हे तर वारंवार भेटण्याचा योग आला यापेक्षा मोठं ते भाग् ...
भारतरत्न अटलजींच्या जाण्याने केवळ भाजपच नव्हे, तर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अजातशत्रू म्हणून नावलौकिक मिळवलेले अटलजी पक्षाच्या, जाती, धर्माच्या पलीकडचे होते. ...
जनसंघापासून राजकारणात सक्रिय असल्याने माझा अनेक नेत्यांशी संबंध आला. अटलजींशी अनेक वेळा भेटायचा, बोलायचा योग आला. अटलजी आम्हा जुन्या कार्यकर्त्यांचे आदर्श होते. ...
- नामदेव मोरेनवी मुंबई - दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला संवर्धन व विकासासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चालना दिली होती. किल्ल्याला भेट देऊन निधीही मंजूर केला होता. देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई विमानतळासाठी प्राथमिक तयारी त्यांच्या ...
राजकारणात ज्यांचा आदर्श समोर ठेवावा अशी फार थोडी माणसे सध्या आहेत. त्यातील विख्यात अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत चेहरा म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असल्याची भावुक प्रतिक्रिया सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यां ...
दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला संवर्धन व विकासासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चालना दिली होती. किल्ल्याला भेट देऊन निधीही मंजूर केला होता. ...