अटलबिहारी वाजपेयी यांचे अमरावतीशी ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:21 AM2018-08-17T01:21:58+5:302018-08-17T01:22:40+5:30

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १९६६ आणि १९८० साली अमरावतीत जाहीर सभा झाल्या. अमरावतीशी त्यांचे ऋणानुबंध होते, अशी माहिती जनसंघाचे जुने जाणते कार्यकर्ते छोटेलाल केसरवानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Amalpati's relationship with Atal Bihari Vajpayee | अटलबिहारी वाजपेयी यांचे अमरावतीशी ऋणानुबंध

अटलबिहारी वाजपेयी यांचे अमरावतीशी ऋणानुबंध

Next
ठळक मुद्देअटलबिहारी वाजपेयी यांच्या अमरावतीत दोन सभा

छोटे मन से कोई
बडा नही होता,
टूटे मन से कोई
खडा नही होता...
- अटलबिहारी वाजपेयी />अमरावती : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १९६६ आणि १९८० साली अमरावतीत जाहीर सभा झाल्या. अमरावतीशी त्यांचे ऋणानुबंध होते, अशी माहिती जनसंघाचे जुने जाणते कार्यकर्ते छोटेलाल केसरवानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अटलबिहारी वाजपेयी हे जनसंघाच्या बांधणीसाठी अमरावतीत सन १९६६ मध्ये आले होते. त्यावेळी येथील नेहरू मैदानात त्यांची विराट सभा झाली होती. या सभेसाठी मोतीलाल ककरानिया, नानासाहेब सामन, लक्ष्मीप्रसाद गुप्ता, भोजराज गुप्ता, सातप्पा कोल्हे, बिहारीलाल अग्रवाल, हनुमान शर्मा, रमेश दुबे आदींनी मोलाची कामगिरी बजावली. त्यावेळी माझ्याकडे जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती, असे छोटेलाल केसरवानी यांनी सांगितले. नेहरू मैदानातील सभेचे स्टेज, अटल बिहारी यांच्यासमवेत कोणते स्थानिक पुढारी असतील, याचेदेखील नियोजन होते.
नेहरू मैदानातील सभपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांनी गणेशदास राठी छात्रालय आणि शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (व्हीएमव्ही) च्या विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधला. देशाच्या अखंडतेसाठी जनसंघाची विचारधारा त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये ठसवली. देशाबद्दल प्रेम, आस्था आणि सामाजिक समरसतेच्या विचारांवर ते शेवटपर्यंत अटल होते. ‘पद नव्हे - देश मोठा’ हा संदेश त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात नेला. त्यामुळे जनसंघाच्या बांधणीतूनच भाजपचा वटवृक्ष बहरला. वाजपेयींनी भारतमातेच्या ऋणात राहण्याची दिलेली शिकवण जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत जपणार असल्याचे छोटेलाल केसरवानी यांनी सांगितले.
मालती जोशी, रियाज अहमद यांच्या प्रचारार्थ सभा
जनसंघानंतर स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्ष ६ एप्रिल १९८० रोजी स्थापन झाला. अमरावती विधानसभा मतदारसंघातून मालती जोशी तर बडनेरा मतदारसंघातून रियाज अहमद यांची उमेदवारी होती. त्यांच्या प्रचारार्थ अटलबिहारी वाजपेयी हे आले होते. ही त्यांची अमरावतीत दुसरी भेट होती. वाजपेयींनी अमरावतीचे जोग चौक (घंटी घड्याळ) तर बडनेºयातील नवीवस्ती स्थित मोदी दवाखान्यासमोरील प्रागंणात जाहीर सभा घेतली होती. अटलजींचे अमोघ वक्तृत्व ऐकण्यासाठी प्रचंड संख्येत नागरिक जमले होते. त्यानंतर ते अकोल्याकडे रवाना झाले. एवढा मोठा नेता सर्वसामान्यासारखा सर्वांमध्ये मिसळून भेटत होता, अशा प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींमध्ये आहेत. मालती जोशी आणि रियाज अहमद यांना शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून भाजपने उमेदवारी दिली होती, हे विशेष.
अग्रवाल यांच्या निवासस्थानी मुक्काम
सन १९६६ मध्ये अमरावतीत अटलबिहारी वाजपेयी यांचा जनसंघाचे कार्यकर्ते बिहारीलाल अग्रवाल यांच्या निवासस्थानी मुक्काम होता. स्थानिक इर्विन चौक ते पंचवटी मार्गावरील वाहतूक शाखेलगतचा जुना बंगला म्हणजे बिहारलील अग्रवाल यांचे निवासस्थान आहे. यावेळी अग्रवाल कुटुंबीयांनी आतिथ्यात कुचराई केली नाही. वाजपेयींचे अग्रवाल यांच्याकडे जेवण आणि रात्रीचा मुक्काम हे त्यांच्या आठवणीत महत्त्वाचे क्षण आहे. कामठी येथील श्रीनारायण अग्रवाल यांच्या स्नेहामुळे वाजपेयींनी बिहारीलाल अग्रवाल यांच्याकडे मुक्काम केला होता. श्रीनारायण अग्रवाल जनसंघाचे कट्टर कार्यकर्ते होते.
वाजपेयींनी घेतला जिलबीचा आस्वाद
अटल बिहारी वाजपेयी हे जनसंघाच्या बांधणीसाठी अमरावतीत पहिल्यांदाच आले होते. बिहारीलाल अग्रवाल यांच्या निवासस्थानी ते मुक्कामास असताना मामाजी प्रतिष्ठानच्या जिलबीचा त्यांनी आस्वाद घेतला. त्यांना जेवणासोबत जिलबी आवडायची. रमेश दुबे, हनुमान शर्मा यांनी खास करून वाजपेयींसाठी जिलबी आणली होती.
अटलजींचा दौरा अन् जनसंघाची सत्ता
धामणगाव रेल्वे : सन १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी विदर्भाची जबाबदारी घेत लगेच दौरा केला. या दौºयात धामणगाव येथील दादाराव अडसड, गणपतदादा पोळ, प्रभाकर जोशी हे सोबत होते. जनसंघाची सत्ता आणण्याचे आश्वासन त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिले. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर जनसंघाची सत्ता धामणगाव रेल्वे व तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथील नगर परिषदांवर आली. त्यावेळी पहिले नगराध्यक्ष म्हणून दादाराव अडसड हे विराजमान झाले. वाजपेयींच्या आदेशावरून विद्यार्थिदशेतील माजी आमदार अरुण अडसड, पद्माकर जोशी, रणजितसिंह ठाकूर, धीरजसिंह ठाकूर, भाऊराव पत्रे, नागेश गाडवे, बापूराव पहाडे हे बांगलादेश मुक्ती आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांना दिल्ली येथे तीन दिवस तुरुंगवास झाला होता.

Web Title: Amalpati's relationship with Atal Bihari Vajpayee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.