माणसाचे आरोग्य सुदृढ व निकोप राहिल्यास आयुष्यात विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साधता येते. मात्र आरोग्य बिघडल्यास इच्छाशक्ती प्रबळ असूनही यशाचे शिखर गाठता येत नाही. ...
नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन स्वत:चे शरीर सुदृढ ठेवावे, देशाची सेवा करण्यासाठी शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. आरोग्य हिच माणसाची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. ...
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आले. हा ओबीसींवर अन्याय आहे. संपूर्ण जिल्हा पेसा क्षेत्र म्हणून शासनाने घोषित केल्याने ओबीसी युवकांचा नोकरीतील संधीचा मार्ग बंद झाला. ...
ठाणेगावचा कायापालट करण्यासाठी आपण सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत या गावाची निवड केली. सदर गावात विविध योजनेतून अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. ...
गडचिरोली-चिमूर या मागास नक्षलग्रस्त लोकसभा क्षेत्रात रेल्वेचे जाळे नसल्याने या भागाचा विकास खुंटला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खनिज व वनसंपत्ती आहे. या खनिज संपत्तीवर प्रक्रिया होण्यासाठी उद्योगधंद्याची गरज आहे. उद्योग निर्माण होण्यासाठी रेल्वे मार ...
स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही अहेरी उपविभागातील अनेक गावांमध्ये आजही वीजसेवा पोहोचली नाही. या भागातील आदिवासी व गैरआदिवासी नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे अहेरी उपविभागात विकासाचा अनुशेष शिल्लक आहे. ...
५० व्या सुवर्णजयंती महोत्सवानिमित्त सुभाषग्राम येथे आयोजित राज्यस्तरीय नेताजी कप फुटबॉल स्पर्धेचा समारोप गुरूवारी झाला. या स्पर्धेत नागपूर येथील संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ५० हजार रूपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. ...
कठाणी नदीवरील पूल अर्धवट असल्याने राजोलीवासीयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. ही बाब खासदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी राजोलीवासीयांनी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचे वाहन अडवून पुलाची पाहणी करण्याची मागणी केली. ...