अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
देशातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची धमक केवळ आघाडीच्याच सरकारमध्ये असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथील प्रचार सभेत व्यक्त केले आहे. ...
लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पाडले. नेहमीपेक्षा गुरुवारी नांदेडचा पारा तसाच कमीच होता़ त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मतदान केले. ...
राज्यात गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणूक नाही, कारखाने नाहीत, रोजगार नाही़ गेल्या ४५ वर्षांत जेवढी नाही तेवढी यावेळी बेरोजगारी वाढली आहे़ भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला असून काँग्रेसची सत्ता आल्यास नांदेडातच रोजगार निर्माण करण्यात येईल़ ...
पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विरोधकांनी नांदेडसाठी काय केले? हे सांगायला हवे. मात्र जनतेचे खरे मुद्दे टाळून प्रचारसभांत निराधार टीकाटिप्पणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास कोणी केला? याची मतदारांनाही जाणीव आहे. ...