'मोदी-शहांना भजी तळायला लावा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:32 AM2019-04-22T05:32:52+5:302019-04-22T07:05:38+5:30

हुकूमशहांना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन

'Modi-bhaj bhaaj hai frost' | 'मोदी-शहांना भजी तळायला लावा'

'मोदी-शहांना भजी तळायला लावा'

पुणे/सांगली : तरूणांना समोसे आणि भजी तळा म्हणणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मतदारांनी सत्तेवरून खाली खेचून, समोसे आणि भजी तळायला लावावे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केली. देशात धार्मिक तेढ निर्माण करणाºया आणि हुकूमशाही आणू पाहणाºया व्यक्तींना घरी बसविण्याचे आवाहन त्यांनी केले.



चव्हाण म्हणाले, सबका साथ आणि सबका विकास असे म्हणणाºया भाजपने केवळ स्वत:च्या पक्षाचा विकास केला. त्यातून जमविलेल्या संपत्तीतून निवडणूक लढवीत आहेत. संविधान जाळण्यापर्यंत मजल गेलेल्या मोदी आणि शहा या हुकूमशहांना घरी बसवून लोकशाही टिकविण्यासाठी महाआघाडीला मतदारांनी साथ दिली पाहिजे.



राज्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. दोन वर्षांपासून ते अभ्यासच करीत आहेत. आता अभ्यास कसला करता, तुम्ही नापास झाला आहात. तुम्हाला घरी बसावे लागेल. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, जाती,धर्माच्या नावावर कोणी निवडून येता कामा नये. लोकसभेच्या पहिल्या पायरीवर डोके ठेवणाऱ्यांनी प्रत्यक्ष संसदेत हुकुमशाही सुरू केली. अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसविण्याचे पाप मोदींनी केले. सांगलीतही अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचारसभा घेतली.

‘मोदींना लाज कशी वाटत नाही’
शहीद जवानांचा अवमान करणाºया उमेदवाराची मोंदी पाठराखण करीत आहेत. निवडणूक हातातून जात असल्याचे दिसत असल्याने धार्मिक धु्रवीकरण करून देशात तेढ निर्माण करणाºया मोदींना मते मागताना लाज कशी वाटत नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींचा समाचार घेतला.

भाजपने वसंतदादांचा पुतळा झाकला
सांगली स्टेशन चौकात भाजपच्या सभेवेळी वसंतदादा पाटील यांचा पुतळा झाकण्यात आला होता. त्यावर विशाल पाटील म्हणाले की, दादांचा पुतळा झाका, फोटो काढून टाका. पण त्यांचे विचार जनतेच्या मनात रूजले आहेत, ते कसे काढणार? हाच धागा पकडत अशोक चव्हाण म्हणाले की, वसंतदादांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची जन्मशताब्दी शासनाने साजरी करायला हवी होती. पण त्यांचे पुतळे झाकण्याचे काम भाजपने केले. त्यांना लाज कशी वाटत नाही?

Web Title: 'Modi-bhaj bhaaj hai frost'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.