आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज आषाढी पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना २०१६ मध्ये विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भेट दिली.या मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता... ...
आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशीदिनी ‘श्रीं’ची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य झाला. मंदिरातील दर्शनबारीत रांगा लावून भाविकांनी गर्दी करीत ‘श्रीं’चे समाधी दर्शन घेतले. ...
आषाढी एकादशीनिमित्त शहरातील कौमुदीप्रेरित महिला संघाच्या वतीने सोमवार (दि.२३) रोजी महिलांनी दिंडीचे आयोजन केले होते. प्रारंभी कौमुदी परिवाराच्या वतीने नामदेव विठ्ठल मंदिरात आरती करण्यात आली. सकाळी ७ वाजता उद्योजक कविता दगावकर व आर्किटेक्ट अमृता पवार ...
देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणांहून धापेवाडा येथे दिंडी व पालख्या दाखल झाल्या होत्या. ...
सकाळपासून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लागलेल्या रांगा, मंदिरांसह घरोघरी सुरू असलेला विठूनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचे निनादणारे स्वर, देवपूजा, दर्शनानंतर खिचडी, फळे आदींच्या सेवनाद्वारे केलेला सात्विक उपवास अशा भक्तिमय वातावरणात शहरात ...
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ‘नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू’‘नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद’ रचनांच्या सुरेल गायनाने खळाळणाऱ्या गोदेच्या काठी नाशिककर भक्तिरसात न्हाऊन निघाले. निमित्त होते आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सुरेल अभ ...
आषाढी एकादशीनिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवारी शहरातून काढलेल्या बालगोपाळांच्या दिंडीत विविध शाळांमधील चिमुकले विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झाले होते. ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष करीत निघालेल्या दिंडीने शहर दुमदुमून गेले. ...