Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
NCP Sunil Tatkare News: सर्वच क्षेत्रात विकासाची झेप घेण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. ...
Maharashtra Budget 2026: हा अर्थसंकल्प मी अजितदादांच्या स्मृतींना समर्पित करत आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामधून अजित पवार यांच्याबाबत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...
Ajit Pawar Plane Crash : व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांची काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात चौकशी झाली.याबाबत आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...
Ajit Pawar Plane Crash विमानाची ऑपरेशन प्रक्रिया, मेंटेनन्स रेकॉर्ड, तांत्रिक बाबी, सुरक्षा नियमांचे पालन, अपघाताशी संबंधित अन्य मुद्द्यांबाबत त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली ...
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारही निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार कुटुंबातील या सदस्याचा निवडणुकीत पराभव झाला. ...