Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Ajit Pawar News: नोव्हेंबर २०१० मध्ये आम्ही दोघांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा सूत्रे सांभाळली. जवळपास साडेचार वर्षे एकत्र काम केले. दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. बऱ्याच अडचणींच्या निर्णय ...
Ajit Pawar Death: गावातील राजकीय मतभेदामुळे तक्रार करणारे पदाधिकारी म्हणाले की, ते भाजपचे शेतकरी आहेत. दादांनी त्यांना फटकारले व म्हणाले की धरणातील पाणी संपले. त्यात ते पेरणी करतात, त्यात तुमचे काय जाते? ...