शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

लोकलमधून पडून तरुण जखमी, डोंबिवली-कोपरदरम्यान घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 6:04 AM

गर्दीच्या रेटारेटीमुळे लोकलमधून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी डोंबिवली-कोपर रेल्वे जलदमार्गावर घडली.

डोंबिवली : गर्दीच्या रेटारेटीमुळे लोकलमधून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी डोंबिवली-कोपर रेल्वे जलदमार्गावर घडली.विशाल गुरव (३४, रा. पंढरीनाथ पाटील चाळ, दावडीगाव, डोंबिवली पूर्व) असे त्याचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरव हा शनिवारी सकाळी कर्जत-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जलद लोकलमध्ये दरवाजात उभा होता. या वेळी गर्दीच्या रेट्यामुळे तो धावत्या लोकलमधून खाली पडला.त्याच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. त्याला लोहमार्ग पोलिसांनी प्रथम महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, नंतर त्याला दावडी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुरव जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली. या घटनेची माहिती समजताच त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. विशाल गुरव याचा लहान भाऊ जयेश गुरवने तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर, कुटुंबीयांनी विशाल याला दावडी परिसरातील खासगी रुग्णालयात हलवल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलAccidentअपघात