दुचाकीवरील ताबा सुटल्याने कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; घोडबंदर रोडवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 21:48 IST2025-11-19T21:47:49+5:302025-11-19T21:48:05+5:30
घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील डिमार्टसमोर बुधवारी सायंकाळी मनोज हा घोडबंदरकडून ठाण्याकडे येत होता. दरम्यान एका कंटेनरला ओव्हरटेक करीत असतांना त्याच्या स्कूटरला दुसऱ्या कंटेनरचा धक्का लागला.

दुचाकीवरील ताबा सुटल्याने कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; घोडबंदर रोडवरील घटना
- जितेंद्र कालेकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: भरघाव वेगातील मनोज किसन चौधरी (वय २५, रा. मनीमंगल इस्टेट, ओवळा , मूळ रा. डहाणू, पालघर) या स्कूटरला कंटेनरचा धक्का लागल्याने त्याचा ताबा सुटून ताे खाली पडला. त्यानंतर दुसऱ्या कंटेनरच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना ठाणे ते घाेडबंदर मार्गावर बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पाेलिसांनी दिली.
घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील डिमार्टसमोर बुधवारी सायंकाळी मनोज हा घोडबंदरकडून ठाण्याकडे येत होता. दरम्यान एका कंटेनरला ओव्हरटेक करीत असतांना त्याच्या स्कूटरला दुसऱ्या कंटेनरचा धक्का लागला. यात ताे स्कूटरसह खाली पडला. डाेक्याला गंभीर मार लागल्याने ताे गंभीर जखमी झाला. त्याला वाहतूक शाखेच्या पाेलिसांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यातील अपघातग्रस्त कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याचा शाेध घेण्यात येत आहे.
भरघाव वेगातील मनाेज या स्कूटर चालकाला अपघाताच्या काही वेळापूर्वीच एका रिक्षा चालकाने स्कूटर हळू चालव असा सल्लाही दिला हाेता. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष करीत त्याची स्कूटर भरघाव वेगाने नेत कंटेनरला ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दाेन कंटेनरच्यामध्ये सापडून त्याचा मृत्यू झाला.