ठाण्यात भावजीकडून मेव्हण्याच्या हत्येचा प्रयत्न; पोटात चाकू खुपसून अवयव काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:23 IST2025-10-07T17:23:36+5:302025-10-07T17:23:36+5:30
ठाण्यात घरगुती वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

ठाण्यात भावजीकडून मेव्हण्याच्या हत्येचा प्रयत्न; पोटात चाकू खुपसून अवयव काढले बाहेर
Thane Crime: कळवा पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. हल्ला करणाऱ्याने तरुणावर निर्घृणपणे चाकूने वार केले आणि त्याचे आतडे फाडून टाकण्याचा प्रयत्न केला. घरगुती भांडण सोडवण्याच्या प्रयत्न करत असताना ही धक्कादायक घटना रविवारी रात्री उशिरा कळवा येथील महात्मा फुले नगरमध्ये घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तर जखमी तरुणावर कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय धोत्रे असे आरोपीचे तर सुरज शिंदे (१९) असे जखमी तरुणाचे नाव आहे. धोत्रेची पत्नी ही सुरजची चुलत बहीण आहे. अजय धोत्रे आणि सुरजच्या बहिणीमध्ये वारंवार भांडणे होत होती. घटनेच्या रात्री, धोत्रेने त्याच्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी १९ वर्षीय सुरजने हल्ला थांबवण्यासाठी हस्तक्षेप करत अजय धोत्रेला रोखण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या धोत्रेने सूरजवर धारदार चाकूने हल्ला केला.
आरोपी अजय धोत्रेनी केलेला हल्ला इतका क्रूर होता की त्याच्या पोटातील आतड्या आणि इतर अवजय बाहेर पडू लागल्या. त्यानंतर सुरजची आई आणि त्याच्या बहिणीने अजयच्या हातातील चाकू खेचण्याचा प्रयत्न तो खाली पडला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. शेजारच्यांनी तात्काळ सूरजला रुग्णालयात दाखल केलं. या घटनेत सुरज याच्या बहिणीच्या हाताला देखील दुखापत झाली आहे. आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाख करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
कळव्याच्या महात्मा फुले नगर भागात सुरज शिंदे हा त्याचे आई-वडिल, भाऊ आणि बहिणींसोबत राहतो. याच भागात त्याची मामे बहिण ही पती अजय धोत्रे याच्यासोबत एका घरामध्ये राहते. अजय त्याच्या पत्नीला मारहाण करत असे. रविवारी मध्यरात्री अजयने पत्नीला शिवीगाळ सुरु केली तेव्हा सुरजने त्याला शांत करण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न केला. सुरज त्याच्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करतोय याचाच राग आल्याने आरोपी अजयने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.