शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

पेट्रोल ओतून तरूणाने भर रस्त्यात पेटवून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:27 AM

मित्राने आपल्या नावावर घेतलेल्या मोबाईल खरेदीच्या कर्जाचे हप्ते फेडत नसल्याने आणि कं पनीने तगादा लावल्याने तरुणाने भर रस्त्यात अंगावर पेट्रोल ओतून पेटवुन घेतल्याची घटना भार्इंदरमध्ये घडली.

मीरा रोड: मित्राने आपल्या नावावर घेतलेल्या मोबाईल खरेदीच्या कर्जाचे हप्ते फेडत नसल्याने आणि कं पनीने तगादा लावल्याने तरुणाने भर रस्त्यात अंगावर पेट्रोल ओतून पेटवुन घेतल्याची घटना भार्इंदरमध्ये घडली.भार्इंदर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, देवचंदनगरमधील जैन भुवनमध्ये मयंक विनोदभाई शहा (२८) कुटुंबासह राहतात. त्यांचा मित्र चेतन याने बजाज फायनान्स कंपनीकडून मयांकच्या नावे हप्त्यावर मोबाईल घेतला. पण तो हप्ते भरत नसल्याने कंपनीकडून पैसे वसुलीसाठी मयांकला सातत्याने फोन येत होते. तगाद्याला कंटाळलेल्या मयंकने चेतनला वारंवार पैसे भरण्यास सांगितले होते. शनिवारच्या रात्रीही नाकोडा रुग्णालयासमोर रस्त्यावर मयांक व चेतनमध्ये यावरुन वाद झाला. त्यातून अखेर मयांकने पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.भर रस्त्यावर झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. लोकांनी मयांकला आधी पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात नेले. पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने नंतर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या कमरेवरचा शरीराचा भाग जळाला असून तो ६० ते ६५ टक्के भाजल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.भार्इंदर पोलिसांनी मयांकचा जबाब नोंदवला असून त्याने कोणाविरुध्द तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल केला नसून घटनेची नोंद केल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेने परिसरामध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते. सुरूवातीला काय झाले याची उपस्थित असलेल्या नागरिकांना कल्पनाच आली नाही, असे काही जणांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा