कल्याणमध्ये २७ प्रभागामध्ये योगदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:49+5:302021-06-22T04:26:49+5:30

डोंबिवली : धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या जीवनात करावा, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले. जागतिक योगदिनाच्या ...

Yog Day celebrated in 27 wards in Kalyan | कल्याणमध्ये २७ प्रभागामध्ये योगदिन साजरा

कल्याणमध्ये २७ प्रभागामध्ये योगदिन साजरा

डोंबिवली : धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या जीवनात करावा, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले. जागतिक योगदिनाच्या निमित्ताने माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आयोजित केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजपचे कल्याण शहर मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे व मोहन टिटवाळा अध्यक्ष शक्तिवान भोईर यांच्या सहकार्याने २७ प्रभागामध्ये योग शिबिर पार पडले. या कार्यक्रमात पवार यांनी कोरोनाकाळात योगासनाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो, शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने योगासने करावीत, असे आवाहन केले.

सकाळी ७ वाजता प्रभाग २१ मध्ये खा. कपिल पाटील व माजी आ. पवार, म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर झाले. पवार यांनी शहरातील प्रभाग कोळीवली, गांधरे, बिर्ला कॉलेज, रामदास वाडी, चिखलेबाग, सिद्धेश्वर अळी, बारावे गोदरेज, फडके मैदान, बेतूरकर पाडा, म्हसोबा मैदान, घोलपनगर (योगीधाम), बैलबाजार, चिकणघर, फ्लॉवर व्हॅली, गौरीपाडा आदी ठिकाणी योगदिनाचे कार्यक्रम आयोजित केले होते.

------------

Web Title: Yog Day celebrated in 27 wards in Kalyan