शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

होय, राज्यपालांना महाशिवआघाडीचे नेते भेटणार, एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 14:42 IST

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असला तरी, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

ठाणे - सत्ता-स्थापनेपेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्वाचे असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीदेखील सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे महाआघाडीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेविषयी काही हालचाली करतील अशी अपेक्षा करण्यात आली होती, ती एवढ्या लवकर होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असला तरी, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देत आहेत. आज महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेविषयी काही हालचाली करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आला, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सत्ता-स्थापनेपेक्षा त्यांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले. सत्तास्थापनेबाबत सर्वच आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे तेच यासंदर्भात निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेल्या नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांना शुभेच्छाही दिल्या.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेShiv Senaशिवसेना