शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मीरा रोडमध्ये शालेय विद्यार्थ्यांची गुड व बॅड टचवरील कार्यशाळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 17:38 IST

राजू काळेभार्इंदर - शालेय विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाण सतत वाढत असून त्यावेळी विद्यार्थ्यांना होणारे स्पर्श कसे ओळखायचे व त्याची माहिती मोकळेपणाने शिक्षक अथवा मुख्याध्यापक, पालकांना त्वरित कशी द्यावी, यावर मीरा रोड येथील वोक्हार्ड या खासगी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुड व बॅड टच या विषयावरील कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.गेल्या काही वर्षांपासून ...

राजू काळेभार्इंदर - शालेय विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाण सतत वाढत असून त्यावेळी विद्यार्थ्यांना होणारे स्पर्श कसे ओळखायचे व त्याची माहिती मोकळेपणाने शिक्षक अथवा मुख्याध्यापक, पालकांना त्वरित कशी द्यावी, यावर मीरा रोड येथील वोक्हार्ड या खासगी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुड व बॅड टच या विषयावरील कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.गेल्या काही वर्षांपासून देशात अनेक कोवळ्या जिवांचा लैंगिक शोषणापायी हकनाक बळी गेला आहे. याला कोण जबाबदार, हा प्रश्न मात्र सर्वच स्तरावर निरुत्तरीत करणारा ठरतो. अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना देशात वाढत आहेत. अनेकदा त्यात घरातील वासनांध मंडळींचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. याखेरीज जवळचे नातेवाईक, शेजारी, शाळेतील कर्मचारी आदींकडूनही लहान बालकांचे लैंगिक शोषण केले जाते. असे प्रकार रोखण्यासाठी शाळा प्रशासनापासून पोलिस, शिक्षक व पालकांपर्यंत अशा सर्वच स्तरातील लोकांनी जागरूकपणे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाल्याने मीरा रोड येथील वोक्हार्ड या खासगी रुग्णालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी गुड व बॅड टच कसा ओळखावा, या विषयावरील कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेत मुलांसाठी मानसोपचार तज्ञ डॉ. धनजंय गंभीरे तर मुलींसाठी स्त्रीरोगतज्ञ डॉ. स्मिता मूर्ती यांनी सहभागी विद्यार्थ्यांना समुपदेशन केले. यावेळी डॉ. धनजंय गंभीरे यांनी, लहान मुलांना एखाद्याचा स्पर्श चांगला आहे की वाईट हेतूने आहे, हे समजणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. हा विषय मुलांना समजावणे किंवा त्याचे त्यांना आकलन करुन देणे, हे अवघड असले तरी किमान त्या सवयीच्या लोकांपासून त्यांना सावध राहणे गरजेचे आहे, किमान इथपर्यंतचे भान त्यांच्यामध्ये निर्माण करणे आवश्यकच असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. स्मिता मूर्ती यांनी, काही मुलांना खास करून मुलींना खोदून खोदून विचारले तरी शाळेत किंवा घराबाहेर काय घडले हे सांगण्याचा त्यांचा स्वभाव नसतो. अशावेळी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याबाबतीत काय घडले, हे जाणून घेण्याची जबाबदारी पालकांची ठरत असल्याचे सांगितले. मुलींची कोणी छेड काढली, त्यांना कोणी अश्लिल भाषेत निर्देश केले, त्यांच्याशी त्या भाषेत संभाषण केल्यास त्यांनी त्याची माहिती पालकांना त्वरित देणे, अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ही भावना मुलींमध्ये वाढविण्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. तसेच लहान वयात अनेक लैंगिक प्रश्न निर्माण होत असल्याने त्या प्रश्नांवरील संभ्रम कार्यशाळेतील चर्चेद्वारे दूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेत ८ ते १५ वर्षे वयोगटातील ९० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे रुग्णालयाचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी यांनी सांगितले. या विषयावर मोफत कार्यशाळा घेण्यास उत्सुक असलेल्या शाळांनी ९२२३४०५१९७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरSchoolशाळा