उसाटने कंपनीत क्रेनच्या अपघातात कामगाराचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 15:50 IST2021-10-13T15:49:23+5:302021-10-13T15:50:56+5:30

Accident Case : याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

A worker died in a crane accident at Usatane | उसाटने कंपनीत क्रेनच्या अपघातात कामगाराचा मृत्यू 

उसाटने कंपनीत क्रेनच्या अपघातात कामगाराचा मृत्यू 

ठळक मुद्देहिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाटने गाव हद्दीत कटेरा कंपनी असून कंपनीत मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान क्रेनच्या साहाय्याने स्लोब ब्लॉक उचलुन दुसऱ्या जागी ठेवत होते.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत उसाटने गावातील कटेरा कंपनीची मंगळवारी सकाळी क्रेनचा अपघात होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाटने गाव हद्दीत कटेरा कंपनी असून कंपनीत मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान क्रेनच्या साहाय्याने स्लोब ब्लॉक उचलुन दुसऱ्या जागी ठेवत होते. यावेळी क्रेनचा अपघात होऊन विशाल विजय घेगडमल-२३ या कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकारची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाल्यावर, पोलीस नाईक जितेंद्र चतुरे यांच्या फिर्यादी वरून क्रेन चालक विनय मिश्रा, सब कॉन्ट्रॅक्टर विनोद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: A worker died in a crane accident at Usatane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.