शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

काम केले एनजीओने, पैसे काढले बांधकाम विभागाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 23:54 IST

जि.प. शाळा दुरुस्ती : भ्रष्टाचाराचा ग्रामस्थांचा आरोप, तर काम वेगवेगळे असल्याचा अभियंत्यांचा दावा

जव्हार : तालुक्यातील देहरे देवगाव या जि.प. शाळेची दुरुस्ती एका एनजीओमार्फत केली होती. मात्र, एनजीओने केलेल्या या शाळेच्या कामाचे आयते अंदाजपत्रक बनवून जि.प. बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांनी पुन्हा याच शाळेवर दोन लाख २० हजार रुपये खर्च करून संबंधित ठेकेदाराला देयके अदा करून निधी बळकावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.शाळा दुरुस्तीच्या नावाखाली देवगाव शाळेचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मंजूर करून घेतले. या भ्रष्टाचाराची ग्रामस्थांना कुणकुण लागली. मागील आठवड्यात शाळेच्या दुरुस्ती सुरू झाली; मात्र ग्रामस्थांनी हे काम थांबवल्यामुळे हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आला आहे. २०१७-२०१८ मध्ये जव्हार तालुक्यातील देवगाव जि.प. शाळेची वर्गखोली दुरुस्तीचे काम ‘वरले पर्सन’ या एनजीओने केले होते. तसेच जि.प.चे शाखा अभियंता एस.जी. वाघमारे यांनी दोन लाख २० हजार इतक्या रकमेचा अंदाजपत्रक बनवून मर्जीतील ठेकेदारांना पुन्हा याच शाळेच्या दुरुस्तीचे काम दिले व या रकमेचा निधी काढल्याचा प्रकार गावातील सुशिक्षित तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील वरिष्ठ नागरिकांना सांगितले. त्यानंतर जव्हार पंचायत समिती बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणाची तत्काळ चौकशी करून त्या भ्रष्ट अभियंत्यावर आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, ग्रामस्थांना देवगाव शाळा दुरुस्तीची माहिती देण्यास जि.प. टाळाटाळ करत आहे. जव्हार तालुक्यात पाच वर्षांत वरले पर्सन एनजीओने केळीचापाडा, चौथ्याचीवाडी, फरळेपाडा, रोजपाडा, देवगाव, घोरपट्टेप, कोगदा, कुंभारखांड, सावरपाडा, मोठा मेढा अशा एकूण १० जि.प. शाळा दुरुस्तीची कामे करून दिली आहेत. एनजीओमार्फत केलेल्या दुरुस्तीपैकी मोठा मेढा व सावरपाडा या शाळांची खोटी दुरु स्ती दाखवून बिल काढल्याची चर्चा आहे.एनजीओने परस्पर दुरुस्तीचे काम न कळविता केले आहे; आणि एनजीओने केलेले काम आणि आम्ही केलेले काम वेगवेगळे आहे. यात कुठलाच भ्रष्टाचार झालेला नाही.- एस.जी. वाघमारे, शाखा अभियंता, जि.प. बांधकाम विभाग, जव्हारदेवगाव जि.प. शाळा दुरुस्ती दाखवून बिले काढली आहेत. त्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा. आम्ही ग्रामस्थ या गंभीर प्रकरणाबाबत आमदारांना भेटून कारवाईची मागणी करणार आहोत.- सदाशिव भोये, सामाजिक कार्यकर्ते