शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या तीन तासांमध्ये ठाणे पोलिसांनी घेतला रुग्णवाहिकेचा शोध

By जितेंद्र कालेकर | Updated: September 23, 2019 22:43 IST

एरव्ही, एखादी घटना घडल्यानंतर तिची तक्रार किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा कार्यान्वित होते. हे सर्वश्रुत आहे. पण, नौपाडा भागातून एक रुग्णवाहिका अचानक गायब झाली. तिची तक्रार दाखल होण्यापूर्वीच तिचा अवघ्या तीन तासांमध्ये शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्दे ठाण्यातील पूर्व दू्रतगती मार्गावरुन गायब झाली होती रुग्णवाहिकानौपाडा पोलिसांनी घेतला शोध गुन्हा दाखल न होताच झाले ‘डिटेक्शन’

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहरातील नौपाडा भागातून शनिवारी अचानक चोरीस गेलेल्या दापोली (जि. रत्नागिरी) येथील एका रुग्णवाहिकेचा अवघ्या तीन तासांमध्ये शोध घेतला. आपली रुग्णवाहिका सुखरुप मिळाली. शिवाय, दापोली येथे तातडीने जायचे असल्यामुळे या रुग्णवाहिकेच्या चालकाने ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.संदीप सुधाकर केळकर (४०, रा. बाजारपेठ, दापोली) हे २० सप्टेंबर रोजी दापोली येथे जात असताना त्यांची रु ग्णवाहिकेच्या इंजिनमध्ये अचानक आवाज आल्याने त्यांनी नौपाडा येथील गुरूद्वारासमोरील मुंबई अहमदाबाद पूर्व द्रूतगती मार्गावर रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उभी केली. त्यानंतर कोपरी येथील एका हॉटेलमध्ये ते विश्रांतीसाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी २१ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खोपोली येथील एका रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका उभी केलेल्या ठिकाणी गेले. मात्र, तिथे कुठेही रुग्णवाहिका आढळली नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने नौपाडा पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन त्यांनी यासाठी दोन पथके तयार केली. ठाणे शहराच्या बाहेर जाणा-या रस्त्यावर शोध घेतला असता, ही रुग्णवाहिका माजिवडा येथील मासळी बाजाराजवळ सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आढळून आली. ही रुग्णवाहिका तिथे कोणी आणि कशी नेली? याचा मात्र उलगडा झाला नसून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दापोली येथे एका रुग्णालयात तातडीने जायचे असल्यामुळे केळकर यांनी याप्रकरणी कोणतीही तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली नाही. मात्र, अवघ्या तीन तासात रु ग्णवाहिकेचा शोध घेणा-या नौपाडा पोलिसांचे त्यांनी आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी