अवघ्या तीन दिवसांत जमा झाली १५० चित्रे; बाळासाहेब ठाकरे कलादालनासाठी उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 12:19 AM2020-02-07T00:19:43+5:302020-02-07T00:20:08+5:30

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

Within 3 days 150 pictures were collected; Balasaheb Thackeray's enthusiasm for art | अवघ्या तीन दिवसांत जमा झाली १५० चित्रे; बाळासाहेब ठाकरे कलादालनासाठी उत्साह

अवघ्या तीन दिवसांत जमा झाली १५० चित्रे; बाळासाहेब ठाकरे कलादालनासाठी उत्साह

googlenewsNext

ठाणे : तीनहातनाका येथे महापालिकेने उभारलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाचे तसेच कलादालनाचे लोकार्पण मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी करण्यात आले. यानिमित्ताने याठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आधारित चित्रे, व्यंगचित्रे आणि शिल्पांचेही प्रदर्शन भरविले आहे. यासाठी अवघ्या तीन दिवसांमध्ये ठाणे-मुंबईतून तब्बल १५० चित्रे जमा करून ती प्रदर्शनामध्ये ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बाळासाहेब ठाकरे हे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, मार्मिक आणि सामनाचे संपादक, शिवसेनेचे कुशल संघटक, बेडर समाजसुधारक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा संपूर्ण इतिहास आणि जीवनप्रवासाची सर्वसमावेशक माहिती देशातील तरुणांसह भावी पिढीला कायमस्वरूपी उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे, त्यांचा जीवनप्रवास, त्यांचे वैयक्तिक आणि प्रासंगिक फोटो, त्यांची गाजलेली भाषणे, पुस्तके आणि भाषणाच्या सीडीज आदींचा संग्रह याठिकाणी ठेवला आहे. महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून हे स्मारक ठाणे महापालिकेने उभारले आहे.

दोन मजल्यांच्या या स्मारकामध्ये चित्रकला, मुद्रण आणि शिल्पकलेसाठी स्वतंत्र दालनांचा समावेश आहे. व्यंगचित्रकार, चित्रकार अशा कलाकारांना आपल्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी या ठिकाणी माफक दरामध्ये ठाणे महापालिकेने स्वतंत्र कलादालनाची सुविधा केली आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक तसेच चित्रकार काशिनाथ साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील ‘स्वत्व’ संस्थेचे श्रीपाद भालेराव यांच्यासह १५० ते २०० चित्रकारांच्या समूहाने ३ ते ६ फेब्रुवारी या अवघ्या तीन दिवसांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १५० चित्रे मिळवली.

यामध्ये चित्रकार प्रकाश बाळ जोशी, चंद्रकांत चेन्ने आणि विजयराज बोधनकर यांनी साकारलेल्या बाळासाहेबांच्या विविध चित्रांचा तसेच शिल्पकार महेश आंजर्लेकर यांच्या शिल्पांचाही यात समावेश आहे. याशिवाय, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी काढलेली बाळासाहेबांची १० व्यंगचित्रे आणि सहा आर्कचित्रेही या दालनात खास आकर्षण ठरली आहेत. दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी जत्रा आणि मार्मिक या मासिकांसाठी काढलेली १० व्यंगचित्रेही स्मारकामध्ये ठेवली आहेत.

शिक्षक संघटनांचे मत जाणून घेणार

या अभ्यास गटातील सदस्यांनी १० फेब्रुवारी रोजी प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. काम करताना त्यांना बदल्यांसंदर्भात येणाऱ्या अनुभवाचा उपयोग करून व प्रातिनिधिक शिक्षक संघटनांकडून चर्चेमधून प्राप्त होणारी माहिती आदींचा तौलनिक अभ्यास करून कार्यान्वित बदल्यांच्या धोरणासंदर्भात आवश्यक त्या शिफारशी करणे अभिप्रेत आहे. या शिफारशींचा अहवाल या अभ्यास गटातील सदस्यांना त्वरित ११ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या फोर्ट येथील बांधकाम भवन,२५ मर्झबान रोड, मुंबई-१ येथे सादर करावा लागणार आहे.

पहिल्या मजल्यावर ठाण्यातील स्थानिक ‘स्वत्व’ या संस्थेच्या ३० कलाकारांची १२० चित्रे असून ठाणे स्कूल आॅफ आर्ट आणि मुंबईतील रचना संसद स्कूल ऑफ आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट येथील शिक्षकांंच्याही चित्रांचा यामध्ये समावेश आहे. पुढील आठ दिवस हे प्रदर्शन कलारसिकांसाठी खुले राहणार आहे.

Web Title: Within 3 days 150 pictures were collected; Balasaheb Thackeray's enthusiasm for art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.