शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीला आर्थिक शिस्त लागणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:58 IST

प्रशासकीय अंदाजपत्रकाकडे लक्ष; उद्या होणार सादर

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे यंदाचे प्रशासकीय अंदाजपत्रक शुक्रवारी दुपारी १२ वाजता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांना सादर करणार आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने या अंदाजपत्रकात काय तरतुदी केल्या जातात, जमाखर्चाचा मेळ कसा घातला जाणार, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.महापालिकेच्या उत्पन्नाची मदार ही मालमत्ताकर वसुलीवर आहे. आतापर्यंत महापालिकेने २५४ कोटींचा मालमत्ताकर वसूल केला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत लक्ष्य गाठण्यासाठी महिनाभरात १०० कोटींची वसुली करावी लागणार आहे. करवसुली विभागाने गतवर्षी ३५० कोटी वसूल केले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी त्यापेक्षा जास्त करवसुलीचे उद्दिष्ट वसुली विभागाचे आहे. मात्र, स्थायी समितीने त्यात वाढ करून ते ४००, तर महासभेने त्यात आणखी वाढ करत ४२० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य ठेवण्यास सांगितले होते. महापालिकेस आर्थिक शिस्त नाही. तसेच उत्पन्नाचे नवे मार्ग शोधलेले नाहीत. महापालिकेस एलबीटीपोटी दरमहिन्याला १४ कोटी ३८ लाखांचे अनुदान मिळते.महापालिकेच्या अर्थकारणास तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे व ई. रवींद्रन यांनी शिस्त लावण्याचे प्रयत्न केले. तर, आयुक्त पी. वेलरासू यांनी तर अनेक विकासकामांना कात्री लावत महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला. त्यावेळी जमा व खर्चात ३०० कोटींची तूट होती. ही तूट भरून काढण्यासाठी त्यांनी पंतप्रधान आवास योजनेत रूपांतरित केलेल्या तीन हजार बीएसयूपी घरांच्या विक्रीतून २२४ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असा दावा केला होता. मात्र, त्यापैकी एकही घर विकले गेलेले नाही. त्यामुळे एक दमडीही महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली नाही.मालमत्ताकर वसुलीसाठी आयुक्त गोविंद बोडके यांनी सरसकट सगळ्यांसाठी अभय योजना लागू केली होती. त्यातून एक हजार कोटी तिजोरीत जमा होतील, असा दावा केला गेला. मात्र, प्रत्यक्षात ६५ कोटीच वसूल झाले. आता मालमत्ता विभागाकडून मागच्या वर्षी अभय योजना होती म्हणून चांगली वसुली झाली, असा दावा केला जात आहे.प्रशासनाकडून दरवेळी दरकरवाढ सुचविली जाते. मात्र, त्यास स्थायी समिती व महासभेकडून नकारघंटा असते. आॅक्टोबरमध्ये महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे प्रशासनाने करदरवाढ सुचवली तर, ती अमान्यच केली जाईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. पालिकेकडे विकासकामांसाठी पैसा नसल्याने स्थायी समितीने यापूर्वी प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात एक कोटींची कामे व त्यानंतरच्या सभापतींनी प्रत्येक प्रभागात २५ लाखांचे काम सुचविले होते. मात्र, पैशांअभावी ती करता आली नाहीत.६६५ कोटी अद्याप थकीतबिल्डरांकडून ओपन लॅण्ड टॅक्सच्या थकबाकीपोटी ३८० कोटी वसूल होणे बाकी आहे.२७ गावे वगळावीत की महापालिकेतच ठेवावीत, याचा निर्णय सरकारदरबारी झालेला नाही. या गावांतून मालमत्ताकराची वसुली अत्यंत कमी आहे.गावातून चालू व थकबाकी मालमत्ताकरापोटी २८५ कोटी येणे बाकी आहे. या सगळ्यांचा विचार करून प्रशासकीय अंदाजपत्रकात काय गोष्टी प्रस्तावित केलेल्या आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका