हुंडाछळ खटल्याच्या रागातून उल्हासनगर चोपडा न्यायालयाबाहेर पत्नीला चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:16 IST2025-08-12T17:13:33+5:302025-08-12T17:16:06+5:30
Ulhasnagar News: पत्नीने पती व घरच्या विरोधात हुंडाबळीची पोलीस केस केल्याच्या रागातून पतीने चोपडा कोर्ट आवरा बाहेर सोमवारी पत्नीला इतर महिलेच्या मदतीने जबर मारहाण केली. मारहाणीत पत्नीच्या पाठीचे हाड फॅक्चर झाले असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल झाला.

हुंडाछळ खटल्याच्या रागातून उल्हासनगर चोपडा न्यायालयाबाहेर पत्नीला चोप
उल्हासनगर - पत्नीने पती व घरच्या विरोधात हुंडाबळीची पोलीस केस केल्याच्या रागातून पतीने चोपडा कोर्ट आवरा बाहेर सोमवारी पत्नीला इतर महिलेच्या मदतीने जबर मारहाण केली. मारहाणीत पत्नीच्या पाठीचे हाड फॅक्चर झाले असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-१, रमाबाई आंबेडकरनगर मध्ये राहणाऱ्या जितेंद्र भगवानजी चौहान यांच्या सोबत काही वर्षांपूर्वी प्रिया हिचे लग्न झाले. लग्नानंतर प्रिया हिचा पतीसह सासरच्या मंडळीकडून छळ सुरू झाला. प्रियाच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात पतीसह अन्य जणावर भांदवी ४९८ अंतर्गत गुन्हा दाखल झाला. याबाबत चोपडा कोर्ट न्यायालयात केस सुरू आहे. आपल्यासह घरच्यांच्या विरोधात केस केल्याच्या रागातून जितेंद्र चौहान, लकिता वाघेला व ऐक अज्ञान महिलेने सोमवारी न्यायालयात आलेल्या प्रिया हिला न्यायालयाच्या आवरा बाहेर गाठून जबर मारहाण केली. या मारहाणीत प्रियाच्या पाठीच्या हाडाला फॅक्चर झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रिया हिच्या तक्रारीवरून रात्री उशिरा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पती जितेंद्र चौहान, लेकिता वाघेला व एका अज्ञात महिले विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे.