ओला कचरा प्रक्रियेसाठी का जात नाही?; अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 01:44 AM2020-02-03T01:44:10+5:302020-02-03T01:44:57+5:30

केडीएमसीच्या कचरा प्रक्रियेचा विषय नेहमीच वादग्रस्त राहिला आहे.

Why not go for the waste? Officials made a statement | ओला कचरा प्रक्रियेसाठी का जात नाही?; अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

ओला कचरा प्रक्रियेसाठी का जात नाही?; अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

Next

- मुरलीधर भवार 

कल्याण : केडीएमसीच्या कचरा प्रक्रियेचा विषय नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्यासाठी उभारलेल्या तीन प्रकल्पांची क्षमता ४५ टन आहे. मात्र, त्या प्रकल्पांत केवळ सहा टनच ओला कचरा जातो. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेनिशी चालत नाही. ओला कचरा प्रकल्पात प्रक्रियेसाठी जात नसल्याने डम्पिंगवरील दुर्गंधीतून नागरिकांची कशी सुटका होणार, असा सवाल शनिवारी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी केला.

स्वच्छतेविषयी व कचरा प्रक्रिया प्रकल्प, आधारवाडी डम्पिंगला लागलेल्या आगीसंदर्भात म्हात्रे यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी कचरा प्रक्रियेप्रकरणी म्हात्रे यांनी प्रभाग अधिकाºयांची कानउघाडणी केली. कचऱ्याच्या मुद्यावर महापालिका वादाच्या भोवºयात आहे. केवळ आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाºयांचीच शहर स्वच्छतेची जबाबदारी नाही, तर ती महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रांतील १० प्रभाग अधिकाºयांचीही आहे. मात्र, प्रभाग अधिकाºयांकडून शहर स्वच्छतेवर देखरेख ठेवली जात नाही. प्रभाग अधिकारी हा प्रभागाचा प्रथम पालक असतो.

शहर स्वच्छतेवर त्याने देखरेख ठेवली पाहिजे, असे म्हात्रे यावेळी म्हणाले. ओल्या कचºयापासून बायोगॅस तयार करण्याचे १३ ठिकाणी प्रकल्प महापालिका उभारणार आहे. त्यापैकी उंबर्डे व बारावे येथे बायोगॅस प्रकल्प सुरू केले आहेत. उंबर्डेतील प्रकल्प हा १० टन क्षमतेचा तर, बारावे येथे गोदरेज कंपनीच्या सीएसआर फंडातून उभारलेला प्रकल्प २५ टन क्षमतेचा आहे. तसेच महापालिकेने उभारलेला तिसरा प्रकल्प १० टन क्षमतेचा असून, तो कार्यान्वित केला आहे. मात्र, उंबर्डे प्रकल्पात केवळ दोन टन ओला कचरा व बारावे येथील २५ व १० टन क्षमतेच्या प्रकल्पात केवळ चार टन ओला कचरा प्रक्रियेसाठी जातो. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण क्षमतेनिशी चालत नाहीत.

तिन्ही प्रकल्पांत दिवसाला एकूण ४५ टन ओला कचरा गेला पाहिजे. तसे झाल्यास डम्पिंगवर ओला कचरा जाणार नाही. या कचºयामुळे दुर्गंधी पसरते, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. ओला कचरा प्रकल्पांना उपलब्ध झाला पाहिजे, असे आदेश म्हात्रे यांनी प्रभाग अधिकाºयांसह घनकचरा विभागाला दिले आहे. महापालिकेने चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे १०४ कोटींचे कंत्राट आर अ‍ॅण्ड डी या खाजगी कंत्राट कंपनीला दिले आहे. कंत्राटदाराने कचºयाचे वर्गीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र, कंत्राटदार प्लास्टिक कचरा व विटा, माती, डेब्रिजही उचलून डम्पिंगवर आणून टाकतो. त्यावर प्रभाग अधिकारी व घनकचरा विभागाचे लक्ष नाही. चार प्रभाग क्षेत्रांत कचरा उचलण्याचे खाजगीकरण केल्यावर तेथील महापालिका कामगारांना अन्य प्रभागांत काम देणे अपेक्षित होते, असा मुद्दाही म्हात्रे यांनी उपस्थित केला.

पहिल्या १०मध्ये येण्यासाठी काम करा : म्हात्रे

स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या वेळी चार हजार शहरांच्या स्पर्धेतून केडीएमसीचा ९७ वा क्रमांक आला होता. त्यानंतर दुसºया वेळी पाच हजार शहरांच्या सर्वेक्षणातून महापालिकेचा ७७ वा क्रमांक आला आहे. हा क्रमांक पहिल्या १०मध्ये येण्यासाठी अधिकाºयांनी काम केले पाहिजे, असेही म्हात्रे यांनी सांगितले.

Web Title: Why not go for the waste? Officials made a statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.