शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

समित्यांच्या निवडणुका होणार तरी कधी?, सदस्यांना लागली प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:55 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने केडीएमसीच्या परिवहन, पूर्व प्राथमिक शिक्षण समिती, प्रभागक्षेत्र सभापतीपदाच्या निवडणुका रखडल्या होत्या.

कल्याण : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने केडीएमसीच्या परिवहन, पूर्व प्राथमिक शिक्षण समिती, प्रभागक्षेत्र सभापतीपदाच्या निवडणुका रखडल्या होत्या. पण, आता लोकसभा निवडणुकीचे निकाल लागूनही महापालिकेतील अंतर्गत निवडणुका घेण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्याने सदस्यांची प्रतीक्षा कायम राहिली आहे.परिवहन समितीमधील सहा सदस्य २८ फेब्रुवारीला निवृत्त झाले. रिक्त जागांसाठी १५ फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात आली. पण, अद्याप सभापतीपदाची निवडणूक झालेली नाही. विशेष बाब म्हणजे परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्तीही कोकण विभागीय आयुक्तांकडून झाली आहे. शिक्षण समिती सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्याने ९ मार्चला झालेल्या विशेष महासभेत नवीन समिती सदस्यही नियुक्त केले आहेत. या समितीच्या सभापतीपदाची निवडणूकही झालेली नाही. परिवहन, शिक्षण समितीसह प्रभागक्षेत्र सभापतीपदाची निवडणूकही होणे बाकी आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. दरम्यान, आता मतमोजणी होऊन लोकसभा निवडणुकीचे निकालही लागले, पण महापालिकेतील अंतर्गत निवडणुकांच्या तारखा जाहीर करायला संबंधित यंत्रणेला अद्याप वेळ मिळालेला नाही.>जूनच्या पहिल्या आठवड्यात परिवहन सभापती निवडणूक?महत्त्वाचे म्हणजे केडीएमसी रामबाग खडक या प्रभाग क्रमांक २६ ची पोटनिवडणूकही जाहीर झाली आहे. २३ जूनला होणाऱ्या या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. असे असताना अंतर्गत निवडणुका होणार तरी कधी? असा सवाल परिवहन, शिक्षण समिती तसेच प्रभाग समिती सदस्यांकडून केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात परिवहन सभापतीपदाची निवडणूक लागण्याची शक्यता आहे.