शाब्बास पोलिसांनो! ग्रीन कॉरीडॉर करत केवळ ३५ मिनिटात रुग्णास मुंबई विमानतळावर पोहचण्यास केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 19:37 IST2021-04-02T19:36:45+5:302021-04-02T19:37:37+5:30
Well Done Cops : पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना याची कल्पना दिल्यावर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती देऊन त्यांची मदत घेण्यात आली.

शाब्बास पोलिसांनो! ग्रीन कॉरीडॉर करत केवळ ३५ मिनिटात रुग्णास मुंबई विमानतळावर पोहचण्यास केली मदत
मीरारोड - मीरारोडच्या वोक्हार्ड रुग्णालयातील एका गंभीर अवस्थेतील रुग्णास हैद्राबाद येथे न्यायचे असल्याने पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर मोहिमे अंतर्गत त्या रुग्णास ३५ मिनिटात विलेपार्ले येथील पवनहंस विमानतळावर नेऊन सोडले.
सदर रुग्णास हैदराबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवायचे असल्याने त्याचे नातलग व रुग्णालय प्रशासनाने शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्याशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना याची कल्पना दिल्यावर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती देऊन त्यांची मदत घेण्यात आली.
वाहतूक पोलीसांनी रुग्णवाहिकेला पायलट वाहनांच्या बंदोबस्तात मीरारोड येथून सकाळी ९ . १७ वाजता प्रवासाला सुरवात केली . पोलीसांनी ग्रीन कॉरीडॉर मोहीम राबवून ३५ मिनीटांत म्हणजेच १० . ०५ वा . रुग्णाला विनाअडथळा विमानतळावर पोहचवले . पायलट वाहनाच्या मदतीने रुग्णवाहिका कुठेही वाहतूक कोंडीत अडकणार नाही याची खबदरदारी पोलिसांनी घेतली . रुग्णाला ११.४० वाजता खास विमानाने हैद्राबादला बागमपेठ विमानतळावर उतरवण्यात आले .