शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यातील उल्हासनदी पात्रात होतो लग्नसोहळ्याचा थाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:12 IST

कृषिपर्यटन, हॉटेल, रिसॉर्ट मालकांवर स्थानिकांनी केली कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातून वाहत असलेल्या उल्हास नदीचा वापर लग्नसोहळ्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा वापर नेरळ जवळ असलेल्या नदी काठी वसलेल्या कृषी पर्यटन-हॉटेल व्यावसायिक-रिसॉर्ट मालक यांच्या माध्यमातून सर्रासपणे होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी पर्यटन-हॉटेल व्यावसायिक, रिसॉर्ट मालकांवर करवाईची स्थानिकांकडून मागणी होत आहे. तर उल्हास नदीच्या संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  सगळीकडे लग्नसराईची धाम धूम सुरू आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शासनाकडून लग्नसोहळ्यासाठी नियम घालून दिले असले तरी हे नियम सर्वच ठिकाणी पालन होत नसल्याचे चित्र समोर येत आहेत. तर उपस्थितांच्या समोर राजेशाही थाट पद्धतीने लग्न सोहळे पार पाडण्यासाठी वधू-वराच्या घरच्या मंडळींकडून अमाप पैसे खर्च केले जात असून,आपलाच सोहळा इतरांपेक्षा वेगळा कसा हे देखील दाखवले जात आहे.     एकीकडे लग्न सोहळ्यासाठी फार्म हाऊस, हॉटेल मालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत ग्राहकांना आमिष दाखवण्याचे काम करत आहेत. यावेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कर्जत तालुक्यातील नेरळ येथील उल्हास नदी काठावरील व्यावसायिकांनी चक्क नदीचा वापर करून नदीकाठ रोषणाईने सजवण्यात आला आहे.  पाण्यात लग्न सोहळ्याचे मंडप थाटले असून,नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक प्रशासन,पाटबंधारे विभाग पोलीस यंत्रणा यांच्या डोळ्यात धूळ फेकत लाखो रुपये हे व्यावसायिक कमविण्याच्या नादात नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत.    एकीकडे उल्हास नदी संवर्धनासाठी बचाव समित्या कार्यरत आहेत. हजारो गाव वाड्या व लाखोंच्या संख्येने जीवांची तहान भागवणाऱ्या या उल्हास नदीत दूषित पाण्यावर वाढणाऱ्या जलपर्णीने जागा काबीज केली आहे. यामुळे उल्हास नदीचे पाणी दूषित होत असल्याचे चित्र समोर असताना, आता लग्न सोहळ्यासाठी या नदीचा विनापरवाना वापर होत असल्याने, तालुक्यातील बारमाही वाहणारी उल्हास नदी संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.      त्यातूनच तालुक्यातून नदीतीरावर वसलेल्या हॉटेल, कृषी व्यावसायिकांकडून नदीत थाटले जाणारे लग्न सोहळे यांच्यावर संबंधित प्रशासनाकडून कारवाई होणार का? की याच व्यावसायिकांकडून संबंधित अधिकारी वर्गाचे हात तर ओले करण्यात आले नाहीत ना? असा प्रश्न स्थानिकांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.