शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरही वाढला

By admin | Updated: February 16, 2016 02:42 IST

वडणुकीचे वर्ष असूनही फारसे मोठे प्रकल्प नसलेला, खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी ऐन पाणीटंचाईच्या काळात पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरात सरसकट २० टक्के वाढ

उल्हासनगर : निवडणुकीचे वर्ष असूनही फारसे मोठे प्रकल्प नसलेला, खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी ऐन पाणीटंचाईच्या काळात पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरात सरसकट २० टक्के वाढ करणारा उल्हासनगरचा अर्थसंकल्प सोमवारी स्थायी समितीला सादर झाला. उत्पन्नवाढीच्या नव्या साधनांचा विचार न झाल्याने आणि निवडणुकीच्या तोंडावर एकही मोठा प्रकल्प हाती न घेतल्याने सत्ताधाऱ्यांतही अर्थसंकल्पाबद्दल नाराजी असून विरोधकांनीही त्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र, ही दरवाढ केली नाही, तर शहराचा विकास अशक्य असल्याचे परखड मत आयुक्तांनी नोंदवले आहे.महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी हा ६०७.३० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या सभापती जया माखिजा यांना सादर केला.पाणीपट्टीवाढीतून ५१ कोटी, तर मालमत्ता करवाढीतून १६ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. याखेरीज, पालिका शाळांसाठी ४२ कोटी, चालिया मंदिर तीर्थस्थळाच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद आहे. रस्त्याच्या सिमेंट क्राँकिटीकरणासाठी ५३.३४ कोटींची तरतूद आहे. पालिकेच्या पाणीपट्टी आणि मालमत्ता करात वर्षानुवर्षे वाढ झालेली नाही. शहर विकास, उत्पन्न-खर्चातील तफावत दूर करण्यासाठी नाइलाजास्तव ७० कोटींची करवाढ करावी लागल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)भुयारी गटार योजना, खेमानी नाला व वालधुनी नदीचा विकास, वाढीव पाणीपुरवठा योजना, पालिका शाळा अद्ययावत करून पुनर्बांधणी करणे, रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांनी शहर विकासासाठी इतर उत्पन्नाच्या मार्गासह दरवाढ ‘जैसे थे’ ठेवली तर शहर विकास शक्य असल्याचे परखड मत त्यांनी नोंदवले.