शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

होळीनंतर जिल्ह्याला पाणी दिलासा; पाणीकपात रद्द? महिन्यातून दोनवेळा केली जाते कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:10 AM

कपातीच्या नावाखाली महापालिका व पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणाकडून पाइपलाइनची विविध कामे व दुरुस्ती हाती घेतली जात आहेत.

सुरेश लाेखंडे ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका असलेल्या शहरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ दिवसांतून एकदा, अशी २४ तासांची पाणीकपात लागू केलेली आहे; परंतु आता ती रद्द करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत. होळीनंतर ती पूर्णपणे रद्द करून शहरांना त्यांचा आवश्यक तीन हजार ६२१ एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्यामुळे गृहिणींची पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

पाणीकपात रद्द करण्याच्या दृष्टीने गुरुवारी बैठक निश्चित केली होती; पण काही अपरिहार्य कारणास्तव ती रद्द झाली; परंतु पुढील आठवड्यापासून म्हणजे होळीनंतर या पाणी कपातीच्या समस्येला आता पूर्णविराम मिळून ती कायमची रद्द करण्याचा निर्णय होऊ घातला आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महिन्यातून दोन वेळा २४ तासांची पाणी कपात लागू केली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे; पण त्याहीपेक्षा महापालिका, नगरपालिका आणि पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांकडून या कपातीच्या कालावधीला धरून दुरुस्तीची कामे काढल्यामुळे पाणी समस्या जिल्ह्यात गंभीर झाली आहे.

कपातीच्या नावाखाली महापालिका व पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणाकडून पाइपलाइनची विविध कामे व दुरुस्ती हाती घेतली जात आहेत. त्यामुळे कपातीचा कालावधी संपलेला असतानाही नागरिकांना तीव्र पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे; पण आता ही कपातही रद्द होणार असल्यामुळे संबंधित महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या मागणीस अनुसरून मुबलक पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे सुतोवाच पाटबंधारे विभागाने केले आहे. कारण आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आलेला आहे. 

२.८० कोटी लोकसंख्येला लागते ३६२१ एमएलडी पाणीजिल्ह्यातील भातसा या सर्वाधिक मोठ्या जलाशयासह बारवी धरण, उल्हास नदी, मोरबे, पिसे आदी धरणांतून बृहन्मुंबई महापालिकेसह जिल्ह्यातील ठाणे व उर्वरित पाच महापालिका, दोन नगर परिषदा, दोन नगरपंचायती, बहुतांश ग्रामपंचायती आदींमधील सुमारे दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला रोज तीन हजार ६२१ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा होतो. पण सध्या १५ दिवसांतून २४ तासांची पाणीकपात लागू केल्यामुळे या सुरळीत पाणीपुरवठ्यात खंड पडला होता. तो आता अखंडितपणे सुरू राहणार आहे.

मुंबई महापालिकेला भातसासह मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणातून पाणीपुरवठा होतो. याप्रमाणेच ठाणे मनपाला ४२२ एमएलडी पाणीपुरवठा, भातसा, शहाड टेमघर एमआयडीसी आणि पिसे धरणातून होत आहे. नवी मुंबईला ३३० एमएलडी पाणी मोरबे, हेटवणे आणि बारवी धरणातून सुरू आहे. कल्याण-डोंबिवली २६४, भिवंडी ११० व मीरा-भाईंदरला ९१ एमएलडी पाणीपुरवठा शहरांना टेमघर व एमआयडीसीद्वारे सुरू आहे. बदलापूरला ३७, अंबरनाथ ५५, उल्हासनगर १२० एमएलडी पाणीपुरवठा बारवी व उल्हास नदीतून एमआयडीसह महाराष्ट्र जीवन (एमजेपी) प्राधिकरणाकडून रोज होत आहे. शहरांच्या वाढीव लोकसंख्येस अनुसरून या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी बारवी धरणाची उंची दोन मीटरने वाढवली. एमआयडीला १६० एमएलडी पाणीपुरवठाही बारवीतून होत आहे.

टॅग्स :WaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका