शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

काय चाललंय काय? पालिकेच्या स्वच्छता गृहात चक्क खाजगी वाहनांची धुलाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 7:56 PM

मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा गैरवापर करून शौचालयाचे बाहेरील आवारातच चक्क खाजगी गाड्यांची धुलाई केली जात असल्याचा गैरप्रकार  उघडकीस आला आहे . 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा गैरवापर करून शौचालयाचे बाहेरील आवारातच चक्क खाजगी गाड्यांची धुलाई केली जात असल्याचा गैरप्रकार  उघडकीस आला आहे . 

भाईंदर पश्चिमेस नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाला लागून महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे . सदर शौचालयाच्या देखभाल - स्वच्छतेसाठीची जबाबदारी महापालिकेच्या देखरेखी खाली होते . परंतु सदर ठिकाणी देखभालीसाठी ठेवलेल्या लोकां कडून मात्र पालिकेच्या पाण्याची चक्क बेकायदा विक्री खाजगी वाहनांच्या साफसफाई साठी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे . 

येथील कर्मचारी पालिकेच्या पाण्याची विक्री खाजगी वाहन चालकांना त्यांच्या वाहनांच्या धुलाई साठी नियमितपणे करत आहेत . त्यामुळे शौचालयाच्या समोरच्या भागात गाड्यांचे बेकायदेशीर वॉशिंग सेंटरच जणू सुरु झाले आहे . सकाळ पासून रात्री पर्यंत येथे मोठ्या बस , रिक्षा , मोटारकार आदी सर्रास शौचालयातील पाणी घेऊन धुतल्या जातात . रस्त्यावरच धुलाईचे काम केले जात असल्याने वाहतुकीला अडथळा होतोच शिवार रस्त्यावर पाणी साचून असते . 

पालिकेच्या पाण्याची बेकायदेशीर विक्री करून खाजगी वाहनांची धुलाई पैसे घेऊन केली जात असल्याची तक्रार युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बामणे यांनी  महेश चव्हाण, शुभम ढोके,प्रशांत मोरे आदी पदाधिकाऱ्यां सोबत जाऊन महापालिका आयुक्त.डाॅ.विजय राठोड, आरोग्य विभागाचे उपायुक्त डाॅ.संभाजी पानपट्टे,  पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक खांबित आदींना केली आहे . पालिकेचे लाखो लिटर पाणी बेकायदेशीरपणे विकून मालमत्तेचा दुरुपयोग व गैरप्रकार करणाऱ्या येथील कर्मचारी आणि त्यांच्या ठेकेदारावर कारवाई करावी . ठेका रद्द करून पाणीचोरीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बामणे यांनी केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक