कोरोनाच्या पहिल्या लसीसाठी तब्बल 4 तासांची प्रतीक्षा; सर्व्हर डाऊन झाल्याने लस घेणाऱ्यांची रखडली नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 01:51 PM2021-01-16T13:51:53+5:302021-01-16T13:53:19+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लस घेण्यासाठी 25 वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी हजर होते. मात्र ही वेळ बदलून सकाळी साडेदहा वाजता लसीकरण सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले.

Waiting 4 hours for the first corona vaccine; due to server down in ambernath | कोरोनाच्या पहिल्या लसीसाठी तब्बल 4 तासांची प्रतीक्षा; सर्व्हर डाऊन झाल्याने लस घेणाऱ्यांची रखडली नोंद 

कोरोनाच्या पहिल्या लसीसाठी तब्बल 4 तासांची प्रतीक्षा; सर्व्हर डाऊन झाल्याने लस घेणाऱ्यांची रखडली नोंद 

Next

अंबरनाथ - अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांना कोरोनावर तयार करण्यात आलेली लस देण्यात येणार होती. सुरुवातीला सकाळी नऊ वाजता ही लस देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार लस घेण्यासाठी 25 वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी हजर होते. मात्र ही वेळ बदलून सकाळी साडेदहा वाजता लसीकरण सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे हे कर्मचारी आहे त्याठिकाणी बसून राहिले. मात्र सकाळी साडेदहा वाजता लसीकरण सुरू होण्याआधीच कोविन हे पोर्टल बंद पडल्याने लस घेणाऱ्यांची नोंद या अ‍ॅपवर झाली नाही. 

अ‍ॅपवर जोपर्यंत नोंदणी होत नाही तोपर्यंत लस देऊ नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे लस घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना ताटकळत बसावे लागले. दुपारी एक वाजेपर्यंत सर्व्हर डाऊन राहिल्याने नोंदणी अभावी लसीकरणाची मोहीम खंडित पडली. लसीकरणासाठी त्या अ‍ॅपवर नोंदणी झाल्यावरच लस दिली जाईल हे स्पष्ट करण्यात आल्याने सकाळी नऊ वाजता आलेले कर्मचारी दुपारी एक वाजेपर्यंत तसेच बसून राहिले. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी गोंधळाची परिस्थिती अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये निर्माण झाली होती. प्रत्येकी 25 सिलास घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चार गट तयार करण्यात आले होते पहिल्या गटालाच चार तासानंतर लगेच मिळाल्याने इतरांना देखील थोडा उशीरानेच लस मिळाले.

 

Web Title: Waiting 4 hours for the first corona vaccine; due to server down in ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.