Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:45 IST2025-07-22T12:41:58+5:302025-07-22T12:45:05+5:30
Virar Delivery Boy Video: विरारमध्ये पार्सल घेऊन आलेल्या एका तरुणाने सोसायटीच्या लिफ्टमध्येच लघवी केल्याचा प्रकार घडला. सीसीटीव्ही फूटेजमुळे ही बाब समोर आली.

Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
Virar News: विरारमधील एका सोसायटीमध्ये डिलिव्हरी बॉयने किळसवाणे कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. वस्तू घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने परत जाताना लिफ्टमध्ये लघवी केली. सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला. लिफ्टमध्ये समस्या आल्यामुळे सोसायटीतील लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सीसीटीव्ही फूटेज पाहण्यात आले. त्यावेळी ही घटना समोर आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विरारमधील सीडी गुरूदेव बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात डिलिव्हरी बॉय लिफ्टमध्ये लघवी करताना दिसत आहे.
डिलिव्हरी बॉय लिफ्टमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. त्याच्या डाव्यात हातात पार्सल आहे. लिफ्टमध्ये आल्यानंतर तो त्याचे कृत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे. सीसीटीव्ही असल्याचे लक्षात येताच तो एका कोपर्यात जातो. सीसीटीव्हीकडे पाठ करून लघवी करतो.
लिफ्टमध्ये बिघाड झाला अन् समोर आला प्रकार
ज्या लिफ्टमध्ये डिलिव्हरी बॉयने लघवी केली होती, तिच्यामध्ये बिघाड झाला. त्यामुळे सोसायटीतील काही जणांनी सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. त्यावेळी ब्लिंकिटचा डिलिव्हरी बॉय लघवी करत असताना त्यांना दिसले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
त्यानंतर सोसायटीतील लोक ब्लिंकिटच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे त्यांनी याबद्दल विचारणा केली. लिफ्टमध्ये लघवी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला त्यांनी पकडले आणि विचारणा केली. त्याने असे काही केले नसल्याचे सांगितले. त्यानंतर सोसायटीतील लोकांनी त्याला सीसीटीव्ही व्हिडीओ दाखवला. व्हिडीओ बघितल्यानंतर त्याने कृत्याची कबुली दिली.
लोकांनी त्याला पकडले आणि चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.