शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Video: बदलापुरात भयंकर घडलं! सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडताना महिलेचा मृत्यू, वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 16:27 IST

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली जलद लोकल रेल्वे पकडताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बदलापूर रेल्वे स्थानकावर घडली. चाकाखाली सापडल्याने महिलेचा जागेवरच मृत्यू झाला.

- पंकज पाटील, बदलापूरबदलापूर रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली लोकल पकडताना एका महिलेचा मृत्यू झाला. हाताने दरवाजा पकडला मात्र पाय ठेवता आला नाही आणि महिला खाली पडून लोकलखाली सापडली. चेतना चंद्रशेखर देवरुखकर असे या महिलेचे नाव आहे. सकाळी 8 वाजून 11 मिनिटांची सीएसएमटी लोकल पकडताना ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

28 वर्षीय चेतना या जुवेली येथील जगन्नाथ गॅलेक्सीमध्ये वास्तव्याला होत्या. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्या 8.11 मिनिटांची मुंबईकडे जाणारी फास्ट लोकल पकडण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. स्थानकात आल्यानंतर लोकल ट्रेन सुरू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी फ्लॅटफॉर्मवरून निघत असलेली लोकल पकडण्याचा प्रयत्न केला.

महिलेचा लोकल रेल्वेखाली मृत्यू, कशी घडली घटना?

मुंबई दिशेकडील पहिलाच महिला डबा पकडताना त्यांचा अंदाज चुकला आणि त्या लागलीच प्लॅटफॉर्मच्या खाली पडल्या. दुर्दैवाने प्लॅटफॉर्मचा शेवट असल्याने त्या थेट लोकलच्या चाकाखालीच साापडल्या आणि या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पादचारी पुलाच्या समोरच महिला डबा असून तो डबा पकडताना त्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी देखील उपस्थित होते. मात्र लोकल ट्रेन सुरू झाल्यावर चेतना यांनी कोणताही विचार न करता थेट लोकल पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे या कर्मचाऱ्यांना देखील केवळ बघण्याशिवाय काहीही मार्ग नव्हता. 

प्रवाशांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाला

अपघात घडल्यानंतर त्याची कल्पना प्रवाशांना आल्यावर त्यांनी लागलीच लोकल गाडी थांबवत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला असून केवळ चेतना याच नव्हे तर अनेक महिला देखील लोकल सुरू होण्याआधी धावत पळत ही लोकल पकडत होते. त्यामुळे सकाळच्या वेळेस महिलांच्या डब्यात लोकल पकडण्यासाठी होणारी कसरत पुन्हा एकदा समोर आली आहे. 

सकाळी 8.11 मिनिटांनी सुटणारी लोकल पकडता न आल्यास नंतर तब्बल 40 मिनिटानंतर बदलापूरहुन सुटणारी लोकल आहे. त्यामुळे 8.11 ची ही लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman dies catching train at Badlapur station; married a year ago

Web Summary : A 28-year-old woman died at Badlapur station while trying to board a moving CSMT-bound local train. She fell under the train, succumbing to fatal injuries. The incident was captured on CCTV. She had been married for a year.
टॅग्स :badlapurबदलापूरMumbai Localमुंबई लोकलDeathमृत्यूViral Videoव्हायरल व्हिडिओ